रत्नागिरी : एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचा धुरळा सुरु असताना दुसरीकडे रत्नागिरीत दुर्घटना घडली आहे. रत्नागिरीतील साखरतर या ठिकाणी होडी पलटी होऊन 9 जण बुडाले आहे. यात तीन जणांचा दुर्देवाने मृत्यू झाला आहे. (Ratnagiri Boat Capsized 3 people died)
मिळालेल्या माहितीनुसार, साखरतर म्हामूरवाडी खाडीत ही होडी पलटी झाली आहे. यावेळी होडीत 9 जणांचा समावेश होता. यावेळी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तर 6 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या सहा जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. सध्या बचाव पथक, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Ratnagiri Boat Capsized 3 people died)
संबंधित बातम्या :
Photo : ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’च्या सेटवर धमाल, विशाल निकमचं सेटवरच वर्कआऊट सेशन
कोरोनाच्या भीतीने गरजेपेक्षा अधिक वेळा हात धुताय? होऊ शकते त्वचेचे नुकसान!