मारायचे असेल तर मारून टाका, बारसूतील आंदोलकांची उद्विग्न प्रतिक्रिया, वातावरण तापलं…

| Updated on: Apr 28, 2023 | 3:09 PM

अश्रु धूरांच्या नळकांड्या फोडून मारल्याचा आरोप करत बारसूतील शेतकऱ्यांनी पोलिसांसह सरकारवर संताप व्यक्त केला आहे. मारून टाका म्हणत शेतकऱ्यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.

मारायचे असेल तर मारून टाका, बारसूतील आंदोलकांची उद्विग्न प्रतिक्रिया, वातावरण तापलं...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

रत्नागिरी : बारसू रिफायनरीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिक नागरिकांनी बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करत असतांना सर्वेक्षण रोखण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याच दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतांनाही नागरिकांनी तो जुगारून सर्वेक्षण स्थळाकडे धाव घेतली होती. त्यामध्ये पोलिस आणि आंदोलन शेतकऱ्यांमध्ये अक्षरशः झटापट झाली. त्यामध्ये आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. अश्रु धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये अनेक आंदोलकांना पोलिसांनी मारल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी बेशुद्ध झालेल्या व्यक्तींची जबाबदारी कोण घेणार म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे.

खरंतर बारसू येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. मात्र, हा प्रकल्प होण्यापूर्वी माती सर्वेक्षण आणि इतर प्रक्रिया पार पाडली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दर्शविला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांच्या उपस्थित निघणारा मोर्चा राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे होऊ शकणार नव्हता. मात्र, त्यापूर्वीच शेतकरी आक्रमक झाले होते. त्यामध्ये अनेक शेतकरी महिलांची आणि पोलिसांची झटापट झाल्यानंतर काहींना लागले आहे.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर आंदोलक महिला शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया देत असतांना पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. पोलिसांनी हटविण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यामध्ये अनेक महिलांना पोलिसांनी मारले, फरफटत नेले, याशिवाय अश्रु धूरांच्या नळकांड्या फोडल्या त्यामुळे अनेक जण बेशुद्ध पडले आहेत. त्यामध्ये काहींना लागल्याने अस्वस्थ झाले आहे.

पोलिसांना विरोध करून सर्वेक्षण रोखण्यासाठी जात असतांना झटापट झाली त्यात मोठा गोंधळ झाला होता. आंदोलकांना हटविण्यासाठी पोलिसांनी जे प्रयत्न केले त्यात काही जण जखमी झाले आहे. त्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले असून आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. जमीन काही कुणाची नाही, त्यामुळे आमच्यावर दादागिरी करू नका म्हणत आंदोलक विरोधावर ठाम आहे.

काही आंदोलकांनी तर आमचा विरोध कायम राहील. जमीन घेऊ देणार नाही. आम्हाला मारायचे मारा, मारून टाकायचे तर मारून टाका पण आम्ही मागे हटणार नाही म्हणत कडाडून विरोध केला आहे. यामध्ये महिला आंदोलकांना यामध्ये लागलं असून त्यांच्यावर उपचार कोण करणार? पोलिसांच्या आई बहिणी असतात तर ते असे वागले असतात का? असा सवाल उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.