उद्धवजी तुम्ही पापी आहात, स्वतःच्या वडिलांशी गद्दारी केली; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचं विधान

| Updated on: Nov 06, 2024 | 10:31 AM

Ramdas Kadam on Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. रत्निगिरीच्या खेडमध्ये बोलताना रामदास कदम यांनी टीका केली आहे. वाचा सविस्तर...

उद्धवजी तुम्ही पापी आहात, स्वतःच्या वडिलांशी गद्दारी केली; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचं विधान
उद्धव ठाकरे
Image Credit source: ANI
Follow us on

उद्धव ठाकरे यांची काल रत्नागिरीत सभा झाली. या सभेतील उद्धव ठाकरेंच्या भाषणावर शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे गद्दार नाहीत, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी तुम्ही केलीत. 40 आमदारांना बदनाम करण्यासाठी खोका तुमच्या डोक्यातून जात नाही, हे सर्व आमदार तुमच्या नाकावर टिचून निवडून येतील. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय कळले… छत्रपती शिवाजी महाराजांनी टकमक टोकावरून तुमचा कडेलोट केला असता. उद्धवजी तुम्ही पापी आहेत, स्वतःच्या वडिलांशी गद्दारी केलीत, रामदार कदम यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे यांचं भाषण हे हास्यास्पद वाटतं. तीच तीच कॅसेट आता घासलेली वाटते. तेच खोके, तेच गटार… विशेषतः उदय सामंत यांचे भाऊ, नारायण राणेजींची मुले, उद्योग गुजरातमध्ये गेले. कोका कोला कंपनीचा अर्ज तुमच्याकडे कुठल्या वर्षांत आला होता. पाच वर्षे तो अर्ज का पडून होता. याचं उत्तर उद्धवजी तुमच्यात हिंमत असेल, प्रामाणिक असाल तर द्या. आदित्य ठाकरे त्या डायरेक्टरला कशाला बोलवत होता, नेमका काय उद्देश होता. तुमच्या अडीच वर्षांच्या काळात कोका कोला कंपनीला परवानगी का दिली नाही, हिमंत असेल तर उद्धव ठाकरे जी उत्तर द्या, असं रामदास कदम म्हणालेत.

उद्धव ठाकरे पापी- रामदास कदम

बाळासाहेब गेल्यानंतर खाण्याचाच कार्यक्रम तुम्ही सुरु केला आहे. तुम्ही मुंबई महानगर पालिकेत काय धंदे केलेत. सगळा मराठी माणूस मुंबईतून घालवण्याचं पाप कोणी केलं. एअरपोर्ट तुम्ही कोणाच्या घशात घातलात. दुसऱ्याला नालायक म्हटलं की आपण लायक होत नाही उद्धवजी! लोकांना फसवण्याचे धंदे थांबवा. हे तुमचं वागणं बघून बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही, असं म्हणत रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

इतरांच्या दाढ्या, जॅकेट काढण्यापेक्षा तुमच्या गाड्या कशा आल्या. कुठून आल्या हे लोकांना सांगाल का तुम्ही? अडीच वर्षांत तुम्ही लोकांना काय दिलंत ते हिम्मत असेल तर सांगा. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने 225 लोकाभिमुख निर्णय घेतले. कोकणात फयान वादळ आलं. तेव्हा शरद पवार यांच्या सारखा माणूस 4 दिवस इथे येऊन थांबले. पण तुमचे अश्रू मगरमछचे आहेत. शरद पवार यांना सांगावं लागलं की उद्धवजी आता बाहेर पडा…, असंही रामदास कदमांनी केलं आहे.