“उठावाच्या आधीची शिवसेना बाळासाहेब यांची राहिली नाही” ; गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटावर तोफ डागली

| Updated on: Mar 19, 2023 | 7:41 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळी महाविकास आघाडीतून बंडखोरी केली त्यावेळीच खऱ्या शिवसेनेचा प्रवास चालू झाला असल्याचे गजानन कीर्तिकर यांनी सांगितले.

उठावाच्या आधीची शिवसेना बाळासाहेब यांची राहिली नाही ; गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटावर तोफ डागली
Follow us on

खेड/रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा विचार केला तेव्हाच हिंदुत्व राष्ट्रीयत्त्व पुसलं गेल्याची टीका गजानन कीर्तिकर यांनी केले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आज खेडमधील गोळी मैदानावर सभा होत आहे. त्या सभेत बोलतानी शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपली होती अशी टीकाही गजानन कीर्तिकर यांनी केली.

खेडमध्ये सभा होत असतानाच गजानन कीर्तिकर यांनी टीका करताना त्यांनी ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला आहे. यावेळी गजानन कीर्तिकर यांनी रामदास कदम यांचा गौरव करत शिवसेनेचा आताचा चाललेला प्रवासच खरा शिवसेनेचा प्रवास चालू आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळी महाविकास आघाडीतून बंडखोरी केली त्यावेळीच खऱ्या शिवसेनेचा प्रवास चालू झाला असल्याचे गजानन कीर्तिकर यांनी सांगितले.

ज्या प्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबईत मराठी माणसाला किंमत आली त्याच प्रमाणे कोकणातील माणसालाही खरी किंमत शिवसेनेमुळे मिळाली असल्याचेही गजानन कीर्तिकर यांनी मत मांडले.

मराठी माणसांचा सर्वांगीण विकास व्हावा, महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईमध्ये जिल्ह्यातून आलेल्या तरुण शिकलेल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर धडपडत होते, मात्र ही सगळी तळमळ शिवसेना ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेली त्याचवेळी शिवसेना संपली असल्याचेही गजानन कीर्तिकर यांनी सांगितले.

शिवसेनेची आक्रमकता संपण्याला खरे कारण आहे ते म्हणजे महाविकास आघाडीसोबत जाणे.त्यामुळेच मराठी माणसांचा विकासही खुंटला असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचा प्रवास हा राष्ट्रवादीच्या अंगाने चालू झाला होता, त्यावेळी रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांनीही तशा सूचना दिल्या होत्या.

मात्र तरीही शिवसेनेचा राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा प्रवास थांबला नसल्यानेच शिवसेनेची आक्रमकता संपून गेल्याची टीका गजानन कीर्तिकर यांनी केली आहे.