रत्नागिरी : शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर भावनिक प्रहार केला. स्वतःचा भाऊ मुख्यमंत्री पदावर बसला आहे हे पहावत नसल्याने राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा हा सारा थयथयाट सुरु असल्याची बोचरी टिका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा द्वेष राज ठाकरे यांच्या मनात भिनला आहे. राज ठाकरे यांची करणमूक करण्याची पद्धत जुनी आहे. प्रत्येक निवडणुकीला सुपारी घ्यायची ही मनसेची जुनी पद्धत आहे. भोंगा हा विषय देशपातळीवरचा आहे. याबाबत नियंत्रण आणायचे असेल तर केंद्राने कायदा करावा, भोंग्याचा विषय घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी हा प्रश्न उचलला गेलाय, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला. रत्नागिरीमध्ये त्यांनी टीव्ही9 सोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
भोंगा हा विषय मुद्दाम उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी उकरून काढल्याची टीका करताना विनायक राऊत म्हणाले, ‘ भोंगा हा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रातला नाही तर देशपातळीवरचा नाही. जर याबाबत निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सराकराने समान कायदा करावा. देशपातळीवर अंमलबजावणी करावी. केवळ महाराष्ट्रात अतिक्रमण झालंय, असं दाखवून महाविकास आघाडील विशेषतः उद्धव ठाकरे साहेबांना त्रास द्यायचा या दुष्ट आणि कपट नितीने भाजपाची सुपारी घेऊन राज ठाकरेंनी केलेलं हे नाट्य आहे. कायद्याने जे करायचंय ते नक्कीच होईल. परंतु केवळ उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी हा प्रश्न उचलला असेल तर महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
राज ठाकरेंची करमणूक करण्याची जी पद्धत आहे जुनी आहे. प्रत्येक निवडणुकीला करमणुकीचे कार्यक्रम घेण्यासाठी कुणाची तरी सुपारी घ्यायची. उद्धव ठाकरे यांच्याविषयीचा मनात द्वेष भिनल्यामुळे… स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलेला पहावत नसल्याने हा चाललेला थयथयाट आहे. राज ठाकरे यांच्या दुष्ट आणि कपट नितीला भाजपाची साथ आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.