परभणी : राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे (Ratnakar Gutte) आमदार रत्नाकर गुट्टे हे कायम चर्चेत राहिलेले आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांचे नावे कर्ज घेतल्याचा आरोप करीत त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली होते. तर मध्यंतरी एका महिलेला मारहाण आणि विनयभंग केल्याप्रकरणी ते चर्चेत आले होते. आता गणेश उत्सवानिमित्त (Gangakhed) शहरांमध्ये शांतता कमिटीच्या बैठका पार पडत आहेत. लोकप्रतिनीधी म्हणून त्यांना गंगाखेड येथील सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, (Police) पोलिसांनीच त्यांना निमंत्रण देऊन या कार्यक्रमात त्यांनी पोलिस हे हाप्ते घेतात, असे विधान केले आहे. त्यामुळे व्यासपीठावर काही काळ कूजबूज झाली पण कोणी काही आक्षेप घेतला नाही. त्यांच्या विधानाने शांतता कमिटीचा उद्देश राहिला बाजूला आणि त्यांच्याच विधानाची चर्चा रंगू लागली होती.
रत्नाकर गुट्टे हे कायम चर्चेत असलेले आमदार आहेत.त्यांनी या कार्यक्रमाला लोकप्रतिनीधी म्हणून उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी शहरातील गणेश मंडळांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे पोलिसांना अपेक्षित होते. मात्र, त्यांनी थेट पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलीस हे हाप्ते घेतात त्यांच्या या विधानाने पोलीस कर्मचारी संतप्त झाले होते. शिवाय व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रनिक लोढा आणि इतर पोलीस कर्मचारी हजर होते. भर कार्यक्रमात यासंबंधी कोणी काही बोलले नसले तरी पोलीसांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
पोलीसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या गुट्टे यांनी गत निवडणुकीच्या काळातच मतदारांना थेट पैसे घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल ते किती जागृत आहेत आहेत याचा प्रत्यय आला होता. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकरणावरुन गुट्टे कायम चर्चेत राहिलेले आहेत. आता पोलीस प्रशासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातच त्यांच्या कारभाराबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
गणरायाचे आगमन दोन दिवसांवर आले आहे. या उत्सवादरम्यान शहरात शांतता रहावी आणि सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम शांततेने पार पडावेत यासाठी या बैठकीचे आयोजन केले जात. शिवाय बैठकीला गणेश मंडळाचे अध्यक्ष, लोकप्रतिनीधी, प्रतिष्ठीत नागरिक आणि पोलीस प्रशासानातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित असतात. त्याच अनुशंगाने या कार्यक्रमाला रत्नाकर गुट्टे हे देखील उपस्थित होते. त्यांच्या अशा विधानाने पोलीस प्रशासानामध्ये मात्र, नाराजीचा सूर उटला होता.