प्रशासनाकडून ब्युटी पार्लर आणि जिमवरील निर्बंधात शिथिलता देण्यात आले आहेत, तसे सुधारीत आदेशही काढले आहेत. ब्युटी पार्लरला 50 टक्के क्षमतेनं परवानगी देण्यात आली आहे. तर जिममध्येही 50 टक्के क्षमतेनं परवानगी असणार आहे. दोन ड़ोस घेतलेल्यांनाच या ठिकाणी जाता येणार आहे, तसेच मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. राज्यात कोरोनाच कहर वाढल्याने राज्य शासनाकडून काल नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे, यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले होते, शनिवारी जारी केलेल्या आदेशात जिम आणि ब्युटी पार्लर बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. आज सुधारीत आदेश काढत काही निर्बंधासह जिम आणि ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
महापौरांकडून मुंबईत पाहणी सत्र
आज मध्यरात्री पासून राज्यात कडक निर्बंध लागत आहेत. त्यातच आज महापैर किशोरी पेडणेकर मुंबईतील महत्वाच्या पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत, पाहणी करत आहेत. नागरिकांना मास्क लावण्याचं आवाहन करत आहेत. आज जूहू चौपाटीला भेट देत महापौरांनी लोकांना मास्क लावण्यास आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले.
अस्लम शेख यांच्याकडूनही कोविड सेंटरचा आढावा