पुणे : कसबा पेठ मतदार ( Kasba Peth ) संघाच्या पोटनिवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला आहे. याच दरम्यान भाजपचे खासदार गिरीश बापट ( MP Girish Bapat ) हे आजारी असतांना प्रचार बैठकीसाठी आले होते. त्यादरम्यान गिरीश बापट यांना व्हीलचेअरवर आणण्यात आले होते, त्यावेळी त्यांच्या नाकाला नळी होती. खरंतर गिरीश बापट हे कसब्यातून गिरीश बापट हे पाच वेळा आमदार राहिले आहे. आणि आता खासदार आहेत. त्यात पोटनिवडणूक जाहीर झालेली असतांना गिरीश बापट स्वतः प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने टीका केली होती. त्यावर भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर –
80 वर्षाचे पवार साहेब व्याधीग्रस्त असताना पावसामध्ये भिजत सभा घेतात तेव्हा राष्ट्रवादी त्यांच्या जीवाशी खेळत नव्हते का ? असा सवाल उपस्थित करत भाजप प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केविलवाणा आरोप करून राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतःचा पराभव मान्य केला आहे अशी टीका केली आहे. याशिवाय पक्षनिष्ठा काय असते हे गिरीश बापट यांनी दाखवून दिलं आहे असेही तुळजापुर यांनी म्हंटलं आहे. गिरीश बापट कसब्यात सक्रिय झाल्यानंतर भाजपवर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून झालेली टीका काय ?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी गिरीश बापट यांना प्रचारात आणल्याने भाजपवर टीका केली होती. त्यावेळी प्रशांत जगताप म्हणाले होते की, गिरीश बापट हे प्रचारात उतरत आहे पण मुळात त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे. तरीही भाजपने त्यांना प्रचाराची गळ घातली आहे. मागील पाच वर्षात बापट यांना भाजपने लांब ठेवले होते. भाजपचे मेळावे आणि कार्यक्रम असतांनाही त्यांचे फोटो लावले जात नव्हते. याशिवाय आता कसब्यात अडचण झाल्यावर बापट यांची भाजपला आठवण झाली आहे. बापट आजारी असतांना त्यांना प्रचारात उतरून भाजप त्यांच्या जीवाशी खेळतंय असं म्हंटलं होतं.
पुण्यातील कसबा मतदार संघातील कसब्याच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आले आहे. उमेदवारी देण्यापासून ते प्रचारापर्यन्त रणधुमाळी पाहायला मिळत आहे. त्यामध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये सरळ लढत आहे.
कॉंग्रेसचा उमेदवार असला तरी महाविकास आघाडीम्हणून प्रचार केला जात आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी रणधुमाळी पाहायला मिळत आहे. त्यात गिरीश बापट आजारी असतांना प्रचाराला आल्यानं आरोप प्रत्यारोप सुरू आहे.