मुक्त विद्यापीठाला उशिरा सुचले शहाणपण…”या” कारणामुळे हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले…

| Updated on: Oct 29, 2022 | 7:52 PM

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या जवळपास चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल पुनर्नोंदणी शुल्क न भरल्याने राखून ठेवले आहे.

मुक्त विद्यापीठाला उशिरा सुचले शहाणपण...या कारणामुळे हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिक येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा गलथान कारभार समोर आला आहे. चक्क परीक्षा झाल्यानंतर पुनर्नोंदणी शुल्क वसुलीसाठी तब्बल चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल रोखून ठेवले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठात चौकशी केल्याने उघड झाली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाने दोन हजार रुपये पुनर्नोंदणी शुल्क वसूलीसाठी निकाल न दिल्याने विद्यार्थीमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली असून विद्यापीठाच्या कारभारावरच शंका घेतली जात आहे. सध्या विद्यार्थ्यांना पुनर्नोंदणी शुल्क दोन हजार रुपये भरल्याची पावती दाखवूनच निकाल दिला जाईल अशी भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. दरम्यान मुक्त विद्यापीठाने शुल्क वसूलीसाठी जे धोरण हाती घेतले आहे त्यावर आक्षेप घेतला जात असून पुनर्नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसतांना तुम्ही आम्हाला परीक्षेलाच कसे बसू दिले असा उलट सवाल विद्यार्थी उपस्थित करत असून संताप व्यक्त करत आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या जवळपास चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल पुनर्नोंदणी शुल्क न भरल्याने राखून ठेवले आहे.

परीक्षा झाल्यानंतर विद्यापीठाने निकाल जाहीर झाल्यावर ही कोणरे शुल्क आकारणी सुरू केली असा सवाल उपस्थित केल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्न निर्माण केले आहे.

हे सुद्धा वाचा

पुनर्नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसतांना परीक्षा कशी झाली ? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात असून विद्यापीठाच्या कारभार पाहता उशिरा सुचलेले हे शहाणपण असल्याची टीका होऊ लागली आहे.

विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी काही कालावधी ठरवून दिलेला आहे, मात्र तरीही अनेक विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने त्यांना पुनर्नोंदणी करावी लागते.

मात्र, कालावधी संपलेला असतांना विद्यार्थ्यांकडून पुनर्नोंदणी शुल्क न घेता परीक्षेला परवानगी देण्यात आली होती.

हीच बाब निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आल्यावर ही पुनर्नोंदणी शुल्क आकारणी धोरण घेतले आहे.

पुनर्नोंदणी शुल्क भरल्याची पावती ईमेल द्वारे पाठवून निकाल दिला जाईल असाही संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहे.