मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला आहे. तथापि, काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षा चालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत आहेत, अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहेत. याच तक्रारींची दखल म्हणून परवानाधारक रिक्षाचालकांना फॉर्म भरण्याची गरज नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. (Permits or License holder auto rickshaw driver no need to fill up a form for rs 1500 subsidy in Maharashtra)
राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर उद्योगधंदे तसेच इतर व्यवसाय बंद झाल्यामुळे राज्य सरकारने व्यवसायिक, व्यापारी तसेच रिक्षा चाकल यांना मदत म्हणून मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यामध्ये सरकारने रिक्षाचालकांना 1500 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी परवानाधारक रिक्षा चालकांकडून प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्याकडून म्यॅन्युअली फॉर्म भरून घेतले जात आहेत. सध्याच्या कोरोनाकाळात घराबाहेर पडणे जिकरीचे आहे. तरीसुद्धा म्यॅन्युअली फॉर्म भरून घेतले जातायत. त्यामुळे या प्रकारामुळे परवानाधारक रिक्षाचालकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आता शासनाने मोठा निर्णय घेत राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना कोणताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले आहे.
दरम्यान, परवानाधारक रिक्षा चालकांना कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. त्यांना मिळणारे सानुग्रह अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात काम सुरु आहे. त्यासाठी पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरु आहे. ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना तसेच रिक्षाचालकांना याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित करण्यात येणार आहे. यासाठी मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेणे किंवा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे परिवहन उपायुक्त यांनी कळविले आहे.
महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यावर एकमत, 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला तूर्तास ब्रेक : राजेश टोपेhttps://t.co/OE39z7wj1k#Maharashtra #Lockdown #CoronaVaccination #RajeshTope @rajeshtope11 @CMOMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 12, 2021
इतर बातम्या :
आता गॅस कनेक्शन मिळवणे झाले सोपे, केवळ एखादे कागदपत्र दाखवा आणि मिळवा कनेक्शन
लस निर्मिती कंपनी ‘भारत बायोटेक’लाही कोरोनाचा विळखा, कंपनीतील 50 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
(Permits or License holder auto rickshaw driver no need to fill up a form for rs 1500 subsidy in Maharashtra)