‘तुमच्यासोबत गेलेली लोक चेक करा…. लवकरच’; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने कुणाला दिला इशारा?

| Updated on: Oct 16, 2023 | 9:46 PM

बुलढाणा दौऱ्यावर असताना रूपाली चाकणकर यांनी बैठका घेतल्या. मात्र, या बैठकांमध्ये त्यांनी बेपत्ता झालेल्या मुलींबाबत चकार शब्द काढला नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून राज्यात अपयशी ठरत असून महिलांच्या सुरक्षितच्या बाबतीत हे सरकार असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी केली.

तुमच्यासोबत गेलेली लोक चेक करा.... लवकरच; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने कुणाला दिला इशारा?
RUPALI CHAKANKAR AND ROHINI KHADSE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

जळगाव : 16 ऑक्टोबर 2023 | तुमच्यातले किती लोक आमच्याकडे येणार आहे हा आकडा तुम्हाला थोड्या दिवसात कळणार आहे. त्यामुळे तुम्ही पहिले तुमच्या लोकांकडे लक्ष ठेवा. हे खरं आहे. सत्य आहे. अजूनही कोणी ओपनली सांगू शकत नाही की कोण कोणासोबत आहे. दादा यांच्यासोबत किती जण आहेत ते ही लवकरच कळेल. पण, मतदार हे पवार साहेबांसोबत आहेत. राष्ट्रवादी ही पवार साहेबांचीच आहे. जे आमच्यासोबत आहेत त्यांनी जाहीररित्या सांगितले हे. पण ज्यांनी सांगितले नाही त्यांची काही कारणे आहेत. त्यामुळे ते लोक आमच्याकडेच परत येणार आहेत असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केलाय.

तुमच्यासोबत गेलेली लोक एकदा चेक करा. भरपूर लोक आमच्याच संपर्कात आहेत. फक्त राष्ट्र्वादिसिक नाहीत तर शिव्सेनेते गेलेले काही जण आमच्या संपर्कात आहेत. लवकरच ते कोण हे तुम्हाला समजेल असा टोला त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना लगावला. यावेळी त्यांनी अजितदादा गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नुकताच बुलढाणा जिल्ह्याचा दौरा केला यावरून रोहिणी खडसे यांनी त्यांना धारेवर धरले. बुलढाणा जिल्ह्यात ५५७ मुली बेपत्ता आहेत. मात्र, बुलढाणा जिल्ह्यात जाऊनही रुपाली चाकणकर यांनी बेपत्ता मुलींबाबत एक चकार शब्द काढला नाही. महिलांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले अशी टीका त्यांनी सरकारवर केली.

हे सुद्धा वाचा

महिलांचे संरक्षण करण्यात सत्ताधारी सरकार अपयशी ठरत आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात ५५७ मुली बेपत्ता आहेत. यावरून संपुर्ण महाराष्ट्राची परिस्थिती आपण समजू शकता. मुली बेपत्ता होत आहेत तरी त्यावर गृहखाते काय करत आहे याचा पत्ता लागत नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बेपत्ता झालेल्या मुलींबाबत एकही शब्द काढला नाही. यावरून शासन आणि सरकार महिलांच्या बाबतीत असंवेदनशील आहे असे त्या म्हणाल्या.