मुंबई : फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने (zomato) सोमवारी त्याचा नवीन निर्णय जाहीर केला आहे. त्यात 10 मिनीटात फूड डिलीव्हरी (Food delivery) होईल असे सांगण्यात आलंय. झोमॅटोचे सह-संस्थापक दीपंदर गोयल यांनी ट्विटरवर ही घोषणा केली, ते म्हणाले की ते पुढील महिन्यात गुडगावमध्ये प्रथम ही योजना लॉन्च होईल. सध्या 30 मिनीटांचा डिलीव्हरी वेळ असल्याने ही प्रोसेस स्लो झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी झोमॅटो-समर्थित ब्लिंकिट (तेव्हा ग्रोफर्स म्हणून ओळखले जाणारे) 10-मिनिटांत किराणा पोहोचवण्याच्या घोषणेनंतर आता फूड डिलीवरीसंधी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. गोयल म्हणाले की, डिलीव्हरी बॉयच्या (delivery Boy) सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही. मात्र याच मुद्द्यावरून या निर्णयाला विरोधा होताना दिसून येत आहे. आमदार रोहित पवारांनी हाच मुद्दा उपस्थित करत याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या घोषणेचे भवितव्य काय असणार? हे अजून स्पष्ट झाले नाही.
सह-संस्थापकांचं ट्विट
Announcement: 10 minute food delivery is coming soon on Zomato.
Food quality – 10/10
Delivery partner safety – 10/10
Delivery time – 10 minutesHere’s how Zomato Instant will achieve the impossible while ensuring delivery partner safety – https://t.co/oKs3UylPHh pic.twitter.com/JYCNFgMRQz
— Deepinder Goyal (@deepigoyal) March 21, 2022
तरुणांच्या सुरक्षेवरून आक्षेप
आमदार राहित पवार यांनी तरूणांच्या सुरक्षेवरून या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. झटपट डिलीव्हरीच्या नादात तरूणांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे रोहित पवारांचे म्हणणे आहे. तसेच याबाबत आम्ही परिवहन मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. हा मुद्दा पुढेही लावून धरू आणि या तरूणांना जीव धोक्यात घालू देणार नाही, अशी प्रतिक्रिया रोहीत पवारांनी दिली आहे. त्यामुळे या निर्णयाला महाराष्ट्रातून तरी विरोध होताना दिसतोय. झटपट डिलीव्हरीच्या नादात अपघात घडण्याची भिती रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.
डिलीव्हरी बॉयवर दबाव नाही
आम्ही डिलीव्हरी पार्टनरवर अन्न जलद पोहोचवण्यासाठी कोणताही दबाव टाकत नाही. तसेच आम्ही डिलिव्हरी बॉयना उशीरा डिलीवरीसाठी दंडही करत नाही.वेळेचे ऑप्टिमायझेशन रस्त्यावर होत नाही आणि त्यामुळे कोणत्याही जीवाला धोका नाही, असे झोमॅटो कडून सांगण्यात आलंय. झोमॅटोने सांगितले की, जलद वितरण “फिनिशिंग काउंटर” च्या नेटवर्कवर अवलंबून असेल जे जवळच्या मागणी असलेल्या ग्राहकांसाठी उपयुक्त राहणार आहे. मात्र या निर्णयाला आता मोठा विरोध होऊ लागला आहे. सरकार आता यावर काय निर्णय घेतंय याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ajit Pawar : व्यापाऱ्यांना ‘अभय’, 10 हजार रुपयांची थकबाकी माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राजकारणात कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते, राऊतांच्या विधानावर pankaja munde यांची सूचक प्रतिक्रिया