सांगली : सांगलीत (sangli) जिल्ह्यात वय पूर्ण नसताना वाहने चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्यावर आता आरटीओ विभागाने (RTO Department) कारवाई सुरू केली आहे. यावेळी आरटीओ विभागाने अल्पवयीन मुलांना वाहने चालवायला देऊ नका असे आवाहन सुध्दा पालकांना केलं आहे. गेली एक महिना पालक आणि मुलांना आरटीओच्या अधिकाऱ्यांनी (RTO Officer sangli) समजून सांगितलं आहे. आता या कारवाईला सुरवात केली आहे, ही कारवाईची मोहीम संपूर्ण जिल्ह्यात 1 महिना सुरू राहणार असल्याची माहिती सांगलीचे मोटार वाहन निरीक्षक रमेश पाटिल दिली आहे.
सांगली जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलाना गाडी चालवण्यास देणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे गाडी चालवायला देणाऱ्या पालकांना शिक्षाही होऊ शकते. याबाबत आरटीओ विभागाने सातत्याने प्रबोधन केले आहे. तरीही सांगलीत अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर चालवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा अल्पवयीन मुलाना आरटीओ विभागाने रोखत त्याच्या पालकांना याबाबत समज दिली आहे. यापुढे अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल करण्याचा इशाराही यावेळी आरटीओ विभागाकडून देण्यात आला.
सांगली जिल्ह्यात आतापर्यत अनेक अपघात लहान मुलांच्या हातून घडले आहेत. वारंवार पोलिसांनी पालकांना विनंती करुन देखीन अल्पवयीन मुलं रस्त्याला गाडी चालवताना दिसतात. सांगली जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी सहकारी साखर कारखाने सुरु आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी रस्त्याला वाहतुक अधिक असते. त्याचबरोबर उसाच्या अधिक भरलेल्या गाड्या कायम सुरु असतात. लहान मुलं अधिक वेगाने गाडी चालवतात. मागच्या चार महिन्यात अनेक मुलांचे अपघात सुध्दा झाले आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे.