अहमदनगरः सध्या महिलांबाबत समाजात अनेक बऱ्या वाईट घटना घडत आहेत. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये नृत्यांगना गौतमी पाटील यांचा चेंजिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे महिलावर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असणाऱ्या महिलांनी या घटनेनंतर भीतीही व्यक्त केली आहे. नृत्यांगना गौतमी पाटील यांचा चेंजिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या घटनेची दखल महिला राज्य आयोगाने घेतला असून संबंधितावर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिला आहे.
अहमदनगरला महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आढावा बैठक घेऊन गौतमी पाटील आणि अहमदनगर जिल्ह्यातील ज्या महिला दुबईमध्ये अडकल्या आहेत त्याबाबतही चर्चा केली आहे.
यावेळी रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, यावेळी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा चेंजिंग रूममधला व्हिडिओ व्हायरल होत आहे.
त्या प्रकरणावरून महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरदेखील कडक कारवाई करणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे.
तसेच महाराष्ट्रातील अडीच ते तीन हजार महिला दुबई ओमनमध्ये अडकल्याचे रुपाली चाकणकर यांनी धक्कादायक माहिती सांगितली आहे. महिलांची फसवणूक करून त्यांना त्या ठिकाणी अडकवून ठेवण्यात आले आहे.
कामाच्या अमिष दाखवून महिलांना दुबई आणि ओमनमध्ये घेऊन जाण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे कागदपत्र काढून घेण्यात आल्याचेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
त्यामुळे त्यांचा ठाव ठिकाणा लागत नसून काही महिलांनी संपर्क साधला असून आम्ही त्याबाबत केंद्र सरकारकडे माहिती देऊन त्या महिलांना महाराष्ट्रात कसे आणता येईल याबाबत पाठपुरावा करत असल्याची माहितीही रुपाली चाकणकर यांनी दिली. अनेक महिला अजूनही परदेशामध्ये अडकून पडल्या असल्याची माहितीही रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.