राज्यातील वरिष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे यांनी काही काळापूर्वी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र आता एकनाथ खडसे पुन्हा भाजप प्रवेशास उत्सुक असून गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दलच्या बातम्या, चर्चा सुरू आहेत. पण त्यांची भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा काही अद्याप झालेली नाही, त्यावरून आरोप प्रत्यारोपाचं राजकारणही रंगलंय. भाजपातील दोन नेत्यांमुळे माझा पक्षप्रवेश रखडला असे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या भाजपाप्रवेशावरून बरंच राजकारण सुरू आहे.
त्याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिल्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी यावरू विधान करत खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. ‘स्वार्थासाठी कुणी किती पक्ष फिरावे हा त्यांचा त्यांचा विषय आहे.. आम्हाला आवाहन करण्याची गरज नाही ‘ असं त्या म्हणाल्या. एवढंच नव्हे तर’ सूनेसाठी राजकारण झालं आता लेकीच्या राजकारणासाठी खडसे नेमकी काय भूमिका घेतात.. आम्ही दोन दिवसात पाहू आणि संपूर्ण महाराष्ट्र देखील पाहिलंच’ अशी भूमिकाही चाकणकर यांनी मांडली.
त्यांच्या पद्धतीने सोयीचं राजकारण
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी जळगावमध्ये बोलताना एकनाथ खडसे तसेच रोहिणी खडसे यांच्यावर टीका केली. ‘ स्वार्थासाठी कुणी किती पक्ष फिरावे हा त्यांचा त्यांचा विषय आहे, आम्हाला आवाहन करण्याची गरज नाही. सोयीचं राजकारण करणं ही खडसे कुटुंबियांची भूमिका दिसते आहे आणि याबाबतच्या बातम्या आम्ही अनेक दिवसांपासून बघत आहोत. आता गणेश विसर्जन झालं आहे, त्यामुळे आता
काय बातम्या येतात हे आम्ही बघू. सूनेसाठी राजकारण झालं आता लेकीच्या राजकारणासाठी खडसे नेमकी काय भूमिका घेतात. आम्ही दोन दिवसात पाहू आणि संपूर्ण महाराष्ट्र देखील पाहीलच. सीडी आहे, सीडी आहे करून ते तुतारी सोबत आले, योग्य वेळ आल्यावर आम्ही दाखवू असे ते म्हणत होते, मात्र आता ते नाही म्हणत आहेत. त्यांच्या पद्धतीने ते सोयीचं राजकारण करत आहे’ असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी एकनाथ खडसे तसेच रोहिणी खडसे यांच्यावर टीका करत त्यांना जोरदार टोला लगावला आहे
टीका करत राहणार हा एकमेव विरोधकांचा एकमेव अजेंडा
मी गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करते आहे. मविआचं सरकार असताना सुद्धा मी राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष होते. त्यावेळी अनिल देशमुख गृहमंत्री असताना सर्वाधिक जास्त मिसिंगच्या आणि ह्यूमन ट्राफिकिंग किसेस बाबतची फाईल मी स्वतः गृहमंत्र्यांकडे दिली. यावर त्यांनी काहीही केलं नव्हतं, आत्ताच्या आकडेवारीपेक्षा त्यावेळचा आकडा जरा जास्त होता, असं म्हणत त्यांनी शरद पवार यांनी महिला सुरक्षेवरूने केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं. मात्र लाडकी बहिणीच्या माध्यमातून टीका करत राहणार हा एकमेव अजेंडा विरोधकांनी राबवला आहे, आता कुठे काही झालं तरी विरोधक त्याचा संबंध लाडकी बहीण योजनेशी जोडतात. उठता बसता, झोपतानाही, त्यांना लाडकी बहीण योजनेशिवाय काही दुसरे सुचत नाहीये. एवढी वर्ष महिलांसाठी कोणतीही योजना आणली नाह अशी टीकाही चाकणकर यांनी आणली.
विरोधकांना लाडकी बहीण योजनेची धास्ती
मात्र आता अजित दादांनी महिलांसाठी अत्यंत उपयोगी योजना आणलेली आहे, त्याचा लाभ थेट महिलांना माहीत असल्याने महिलांचा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसतील. त्यामुळे विरोधक काहीही झालं तरी लाडके बहीण योजनेशी कुठल्याही गोष्टीचा संबंध जोडून टीका करत आहेत. नागरिकांकडे घेऊन जाव्यात अशा कोणत्याही योजना, कोणत्याही संकल्पना विरोधकांकडे नाहीत. त्यामुळे केवळ लाडकी बहीण योजनेवर टीका करणे हा एकमेव एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे उरलेला आहे कारण त्यांनी या योजनेची धास्ती घेतली आहे,अशी टीका चाकणकर यांनी केली.