पुणे : आज संपूर्ण दिवसभर हिवाळी अधिवेशनात दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी म्हणून गदारोळ सुरू होता. यामध्ये थेट आदित्य ठाकरे यांना सत्ताधारी पक्षांनी टार्गेट केल्याने आदित्य यांच्या बाजूने महाविकास आघाडीचे नेते सरसावले आहे. एसआयटी चौकशी दिशा सालियन प्रकरणात होणार असल्याचे जाहीर झाल्याने आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असतांना राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील यांनी आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली असून चौकशीत काहीही हाती लागणार नसल्याचा दावा रूपाली पाटील यांनी पुण्यामध्ये केला आहे. रूपाली पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना घाबरनार नाही म्हणत एकदा चौकशी केली तर पुन्हा चौकशी करता येणार नाही असे म्हणत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
दिशा सालियनची केस जरी एस आयटीकडे दिली तरी हाती काही लागणार नाही, पाण उतारा करून घेतील अशी टीका रुपाली पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
एकट्या आदित्य ठाकरे यांच्या विरोधासाठी शिंदे फडणवीसांनी खोटी फौज उभी केली आहे तिला आदित्य ठाकरे याला घाबरणार नाहीत असं देखील रूपाली पाटील यांनी म्हंटलं आहे.
दिशा सालियनचं कुटुंब म्हततंय आमच्या मुलीची बदनामी करू नका, एकदा झालेल्या चौकशीची पुन्हा चौकशी करता येत नाही तरी देखील एसआयटी चौकशी होणार असल्याचे जाहीर केल्याने रूपाली पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.
तुम्हाला कारवाई करायची असेल तर कोर्टात जा, चौकशी करणे बेकायदेशीर असल्याचा दावा करत रूपाली पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सवाल उपस्थित केला आहे.