अहमदनगर : तिकडे युद्धात सारखे बॉम्ब, तोफा, बंदुकीच्या गोळ्या, मिसाईलचे आवाज ऐकून तिकडे युक्रेनचे (Russia Ukraine War) धाबे दणाणले आहेत. तर दुसरीकडे हे युद्ध थांबले पाहिजे असे मत जगभरातून व्यक्त करण्यात येतंय. यावर आपल्या देशातील नेत्यांच्याही अनेक प्रतिक्रिया येत आहे. मात्र आपल्या कवितांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आता रशिया – युक्रेन युद्धाच्या गंभीर विषयावर देखील कविता केलीय. “पुतीनचा बिघडला आहे ब्रेन…म्हणून परेशान आहे युक्रेन” अशा शब्दात कविता करून त्यांनी रशिया – युक्रेन युद्ध थांबून चर्चेतून मार्ग काढावा आणि शांती प्रस्थापित झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केलीय. आठवले कोणत्याही विषयांवर कविता करतात. अगदी कोरोनातही आठवलेंचा गो कोरोना (Corona) गो…हा डायलॉग कित्येक दिवस सोशल मीडियावर व्हायरल होत होता.
युद्धावर आठवलेंंची कविता
ramdas aathvle on war…. रशिया युक्रेन युद्धावर रामदास आठवलेंची कविता… pic.twitter.com/BuytlKbIoc
— Abhishek karande (@Abhishekkaran16) February 27, 2022
आठवले काय म्हणाले?
मराठा आरक्षणाला पाठिंबा
तसेच आठवलेंनी छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणावरही भाष्य केलंय. मराठा आरक्षणाला आरपीआयचा पूर्ण पाठिंबा आहे. संभाजीराजे आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी मोठा आवाज उठवला होता. महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी मराठा समाजाला जागृत केले होते.मी 2 मार्चला आजाद मैदानात त्यांच्या आंदोलनाला भेट देणार, असल्याचेही आठवले म्हणाले आहेत.
आगामी निवडणुकीत भाजपसोबत
आगामी निवडणुकीत आरपीआय भाजपा सोबत राहाणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीत आरपीआयला जागा मिळाव्यात यासाठी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. जनरल जागेबाबत अडचण असेल तर आरक्षित जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे, असेही आठवलेंनी सांगितले. मुंबई महानगपालिकेत रिपाईला 35 ते 40 जागा मिळाव्यात हा आमचा प्रयत्न आहे. यावेळी आम्ही मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातातून हिसकावून घेणार. शिवसेनेवर लोक नाराज असून शिवसैनिकांचा काँग्रेस – राष्ट्रवादीला आतून विरोध आहे. त्यांना अजूनही वाटते भाजपा सोबत जायला पाहिजे, असेही आठवले म्हणाले आहेत, अजूनही वेळ गेली नाही उद्धव ठाकरेंनी विचार करावा, त्यांनी संजय राऊतांच्या भडकवण्याच्या मागे जाऊ नये, उद्धव ठाकरेंनी स्वतंत्रपणे विचार करावा. अडीच – अडीच वर्षांच्या फॉरमूल्यावर भाजपासोबत यायला हरकत नाही. दिर्घकाळ राजकारण करायचे असेल तर अजूनही विचार करण्याची वेळ गेली नाही. असा सल्लाही त्यांनी दिलाय.
नवाब मलिक यांच्याबाबत काय म्हणाले?
काही आमदारांची चौकशी करून सरकार पाडण्याचा आमचा प्रयत्न या आरोपात तथ्य नाही. नवाब मलिक यांना अटक व्हायला नको होती. नवाब मलिक माणूस चांगला आहे. परंतू जमिनीचे व्यवहार चांगले नाहीत. ईडीकडे त्यांच्या विरोधात पुरावे म्हणून अटक झाली आहे. त्यात भाजप सरकारचा काही संबंध नाही, असेही आठवले म्हणाले आहेत.
भाजपला चारशेपेक्षा जास्त जागा मिळणार
आगामी लोकसभेबाबत बोलताना, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आम्हाला 404 जागा मिळणार आहेत. त्यांच्या पाठीमागे सर्व देश उभा आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत बोलताना, मायावतींचा जनाधार उत्तर प्रदेशात घसरला आहे. आरपीआयकडे लोकांचे लक्ष आहे. आरपीआयमुळे पंचवीस टक्के दलीत मतं भाजपाला मिळतील. समाजवादी पार्टीवर करा तुम्ही वार, भाजपा करणार आहे तिनशे जागा पार, असा नारा आटवलेंनी लगावला आहे.
Russia Ukraine war : बेलारुसमध्ये चर्चेसाठी यूक्रेनची सहमती, रशियन माध्यमांचा दावा, विध्वंस थांबणार?
‘मातोश्री’चं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो! सदाभाऊ खोतांचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला
हिंम्मत असेल तर उस्मानाबादेत फिरून दाखवा, राणा जगजीत सिंह यांचा मंत्र्यांना इशार