मुंबई : रशियाने यूक्रेनवरील जोरदार हल्ले (Russia Ukraine War) सुरुच ठेवलेत. तर यूक्रेनकडूनही रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय. दुसरीकडे युद्ध रोखण्यासाठी जागतिक पातळीवर चर्चा सुरु आहे. यूक्रेनचे राष्ट्रपती वोलदीमीर झेलेन्स्की यांनी जगभरातील देशांना मदतीसाठी आवाहन केलं आहे. वोलदीमीर झेलेंस्की (Volodymyr Zelensky) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशीही चर्चा करत युद्धस्थितीची माहिती दिली आणि मदतीची मागणीही केली आहे. अशावेळी यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले जवळपास दीड हजार भारतीय विद्यार्थी या युद्धाच्या संकटात यूक्रेनमध्येच अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. हे विद्यार्थी रोमानिया, हंगेरीमार्गे भारतात परतणार आहेत. तर 300 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं एक विमान रोमानियावरुन भारताकडे रवानाही झालं आहे.
दरम्यान, यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रातील (Maharashtra) तब्बल 1 हजार 200 विद्यार्थी अडकल्याची माहिती राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याकडून (Disaster Management Department) देण्यात आली आहे. यातील 300 विद्यार्थ्यांचा आपल्या पालकांशी संपर्क झाल्याचंही सरकारने सांगितलं. तसंच यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी राज्य सरकारकडून हेल्पलाईनही जारी करण्यात आलीय.
राज्यातील अंदाजे 1 हजार 200 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत, त्यातील ३०० विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात ‘राज्य नियंत्रण कक्ष’ असून विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. तसंच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती राज्याचा नियंत्रण कक्ष 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर, तसेच व्हॉट्सॲप क्रमांक 9321587143 आणि controlroom@maharashtra.gov.in या ईमेलवर द्यावी. तसेच जिल्हास्तरावर देखील हेल्पलाईन क्रमांक जाहीर केलेले आहेत, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती राज्याचा नियंत्रण कक्ष ०२२-२२०२७९९० या दूरध्वनी क्रमांकावर तसेच व्हॉट्सॲप क्रमांक ९३२१५८७१४३ आणि controlroom@maharashtra.gov.in या ईमेलवर द्यावी. तसेच जिल्हास्तरावर देखील हेल्पलाईन क्रमांक जाहीर केलेले आहेत- मंत्री @VijayWadettiwar
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 25, 2022
इतर बातम्या :