नवी मुंबई : मुकेश अंबांनींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून सचिन अटक करण्यात आली आहे. सध्या NIA कडून सचिन वाझेंची झाडाझडती घेतली जात आहे. NIA ने आतापर्यंत महागड्या अशा 5 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये 96 लाखांची ट्राडो, 55-55 लाखांच्या 2 मर्सिडीज कारचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पाच गाड्यांपैकी एक गाडी ही नवी मुंबईची नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे. (Sachin Vaze Case NIA Custody one Car Register at Navi Mumbai)
NIA ने केलेल्या कारवाईत 5 गाड्या ताब्यात घेतल्या आहे. यात 1 स्कॉर्पिओ, 1 प्राडो, 1 इनोव्हा आणि 2 मर्सिडीज या गाड्यांच्या समावेश आहे. यातील एक गाडी ही नवी मुंबईची नोंदणीकृत आहे. MH 43 AR 8697 असा या मर्सिडीज गाडीचा नंबर आहे. ही गाडी नवी मुंबईतील वाशी (सानपाडा) येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातंर्गत असल्याचे समजते.
या काळ्या रंगाच्या मर्सिडीज गाडीचे 18 फेब्रुवारी रजिस्ट्रेशन झाले होते. तर 15 फेब्रुवारीला या गाडीची खरेदी करण्यात आली होती. ही गाडी नर्मदा ऑफशोर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमीटेडच्या या कंपनीच्या नावे रजिस्ट्रेशन असल्याची माहिती समोर येत आहे.
तर चौथी कार MH 02 CC 101 ही प्राडो कार बोरिवली येथे नोंदणीकृत आहे. विजयकुमार भोसले हे या गाडीचे मूळ मालक असल्याची माहिती समोर येत आहे. या गाड्यांच्या नंबर प्लेट या बनावट आहेत का? याची NIA कडून चौकशी सुरु आहे. लवकरच NIA याप्रकरणी नवी मुंबई कनेक्शन उघड करणार आहे.
NIA च्या ताब्यात 5 गाड्या
मुकेश अंबांनींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकप्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची झाडाझडती सुरु आहे. NIA ने आतापर्यंत महागड्या अशा 5 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये 96 लाखांची ट्राडो, 55-55 लाखांच्या 2 मर्सिडीज कारचा समावेश आहे. NIA च्या हाती हे घबाड लागलं आहे.
NIA ने काही दिवसांपूर्वी आणखी दोन गाड्या ताब्यात घेतल्या. यामध्ये एक मर्सिडीज आणि एक ट्रॅडो कारचा समावेश आहे. NIA ने आतापर्यंत ताब्यात घेतलेली ही पाचवी कार आहे.
सर्वात आधी इनोव्हा कार ताब्यात
सर्वात आधी NIA ने स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतली होती. त्यानंतर स्फोटकांजवळ CCTV मध्ये दिसलेली इनोव्हा कार ताब्यात घेतली. त्या इनोव्हा कारच्या चौकशीदरम्यान NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. सचिन वाझे यांच्या चौकशीदरम्यान मर्सिडीज कारची माहिती मिळाली. मग NIA ने ती मर्सिडीज ताब्यात घेतली. अशा एकूण पाच गाड्या आतापर्यंत ताब्यात घेतल्या आहेत.
NIA ने जी टोयोटा प्रॅडो गाडी ताब्यात घेतली आहे, ती अत्यंत महागडी आहे. बेसिक मॉडेलची किंमत 96 लाख 30 हजारांपासून सुरु होते. या गाडीची इंजिन क्षमता 2982 सीसी इतकी आहे. या कारचं मायलेज 11 किलोमीटर प्रतिलीटर आहे. ऑटोमेटिक गिअर सिस्टिम आणि 7 सीटर असलेल्या या भारदस्त कारमध्ये 7 एअरबॅग्ज आहेत. NIA ने सर्वात आधी CCTV मध्ये दिसलेली इनोव्हा कार ताब्यात घेतली होती. (Sachin Vaze Case NIA Custody one Car Register at Navi Mumbai)
अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटातील संशयित सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अडचणीत आता मोठी भर पडली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करुन अनेक पुरावे समोर आणले आहेत. यामध्ये अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही गाड्यांचा सचिन वाझे यांच्या गुन्हे तपास शाखेशी (CIU) संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कटासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार CIU युनिटच्या अधिकाऱ्यांनी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची दोन सीसीटीव्ही फुटेज एनआयएला मिळाली आहेत. यापैकी पहिले फुटेज हे 13 मार्चचे आहे. यामध्ये ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार दुपारी 3.15 वाजता पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडल्याचे दिसत आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी ही कार पोलीस मुख्यालयातून बाहेर पडली होती. त्यानंतर ही इनोव्हा ठाण्याला गेली. यादरम्यान इनोव्हा गाडीची नंबरप्लेट बदलण्यात आल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्यासह संपूर्ण CIU युनिट अडचणीत आले आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 24 फेब्रुवारीला रात्री साधारण एक वाजता अंबानींच्या घराबाहेर दोन गाड्या आल्या होत्या. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी पार्क केल्यानंतर चालक गाडीतून खाली उतरला होता. त्यानंतर मागून एक इनोव्हा कार आली त्यामध्ये बसून तो निघून गेला होता. (Sachin Vaze Case NIA Custody one Car Register at Navi Mumbai)
संबंधित बातम्या :
Sachin Vaze : NIA ने आतापर्यंत किती कार ताब्यात घेतल्या? पाहा भारदस्त कारची झलक PHOTO
अंबानींच्या घराबाहेर कार सोडताना ओळख लपवण्यासाठी ‘त्या’ ड्रायव्हरकडून पीपीई किटचा वापर
सचिन वाझे यांचा पाठलाग होत असल्याचा दावा, वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं ‘त्या’ गाडीविषयी संभ्रम वाढला?