मुंबईः महाराष्ट्रात आता ऊस उत्पादक (Sugarcane growers) शेतकरीसुध्दा आत्महत्या करू लागला आहे. ऊस तोडणीवाचून ऊस शेतात तसाच उभा आहे, आणि उभ्या उभ्या शेतकरी पेटत आहे, आता ही शेतकऱ्यांची अवस्था पाहवत नाही. बीड येथील गेवराई (Gevrai, Beed) तालुक्यांतील नामदेव जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या (Farmer Suicide) केली. त्यामुळे सहकार मंत्र्यांवर मनुषवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही सदाभाऊ खोत यांनी मागणी केली आहे. जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राच्या या राज्यव्यापी दौऱ्यदरम्यान सदाभाऊ खोत हे १६ मे ला बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील आत्महत्या केलेल्या नामदेव जाधव यांच्या कुटुंबीयांची संत्वान भेट घेणार आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोचरी टीका करत म्हटले आहे की, हे ठाकरे सरकार नाही शेतकऱ्याला ठार मारणारं सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असून शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न सुटले नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरही या सरकारमुळे वाईट दिवस आले आहेत. ठाकरे सरकारमुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करायची वेळ आली असल्याचे सांगून त्यांनी ऊस उत्पादक किती मोठ्या संकटात सापडला आहे हेही त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत यांच्याकडून महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका करत आहेत. त्याबरोबरच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही प्रखर टीका केली होती. त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देऊन त्यांच्यावर टीका केली गेली होती.
सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या आणि विशेषतः ऊस उत्पादकांविषयी आस्था दाखवत जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राच्या या राज्यव्यापी दौऱ्यदरम्यान सदाभाऊ खोत हे १६ मे ला बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील आत्महत्या केलेल्या नामदेव जाधव यांच्या कुटुंबीयांची संत्वान भेट घेणार आहेत.