शंकर देवकुळे, सांगली : भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यन्त राहील. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला तरी कमी पडेल, देवेंद्र फडणवीस हे सामान्यासाठी लढत असतात. प्रस्थापिता विरोधात आणि घराणेशाही विरोधात त्यांचा लढा कायम आहे.अशा नेत्यांच्या सोबत आम्ही शेवटपर्यंत राहणार आहे आणि रयत क्रांती संघटना ही त्यांच्याबरोबरच घटक पक्ष म्हणून जोडली गेली आहे. त्यामुळे अशा नेत्यांबरोबर मी शेवटपर्यंत राहणार असल्याचा विश्वास माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत हे नाराज आहे. त्यांना आमदारकी मिळाली नाही म्हणून ते भाजपसोबत राहणार नाही असं अशी टीका सदाभाऊ खोत यांची झाल्याची चर्चा होती. इतकंच काय तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला होता. त्यामुळे सदाभाऊ खोत नेमकं काय निर्णय घेणार अशी चर्चा होती.
माजी मंत्री सदाभाऊ खोत हे नाराज आहे, त्यांना आमदारकीपासून डावलण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय केला असून भाजप सोडणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांना आमदारकी पासून डावलले, त्यांना कुठेही संधी दिली नाही अशी चर्चा सुरू असतांना सदाभाऊ खोत यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडिओ शेअर करत म्हंटलय, देवेंद्र फडणवीस हे सामान्यासाठी लढत असतात. प्रस्थापिता विरोधात आणि घराणेशाही विरोधात त्यांचा लढा कायम आहे. अशा नेत्यांच्या सोबत आम्ही शेवटपर्यंत राहणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीव ओवाळून टाकला तरी कमी पडेल आणि रयत क्रांती संघटना ही त्यांच्याबरोबरच घटक पक्ष म्हणून जोडली गेली आहे. त्यामुळे अशा नेत्यांबरोबर मी शेवटपर्यंत राहणार असल्याचे खोत यांनी म्हंटलं आहे.
सदाभाऊ खोत यांनी शेअर केलेला व्हिडिओ त्यांच्या टीकेवर दिलेलं उत्तर आहे का ? सदाभाऊ खोत यांनी फडणवीस यांना मी तुमच्यापासून दूर जाणार नाही हे सांगायचे होते का ? अशा विविध चर्चा या निमित्ताने सुरू होणार आहे.