‘अहिल्यादेवी होळकरांविषयी इतका आदर वाटतो तर शरद पवारांनी धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही?’

| Updated on: Feb 13, 2021 | 10:00 PM

हा मुद्दा केवळ पुतळ्याचा उद्घाटनाचा नाही. धनगर समाजाला फसवले गेल्यामुळे तो संतप्त झाला आहे. | Sharad Pawar

अहिल्यादेवी होळकरांविषयी इतका आदर वाटतो तर शरद पवारांनी धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही?
जर मेंढपाळाच्या मुलाने त्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले तर शरद पवार यांनी स्वत:च्याच हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट का धरला?
Follow us on

जेजुरी: अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी शरद पवार (Sharad Pawar) यांना इतकेच प्रेम आहे तर आजपर्यंत त्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील (ST Reservation) आरक्षण का मिळवून दिले नाही, असा सवाल रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. तुम्ही 50 वर्षे सरकारमध्ये होता, मग ही गोष्ट का जमली नाही. आतादेखील तुम्ही राज्यात सत्तेत आहात. मग धनगर समाजाला ST प्रवर्गाचे आरक्षण देणे तुम्हाला का जमत नाही, अशी विचारणा सदाभाऊ खोत यांनी केली. (Sadabhau khot slams Sharad Pawar in Sangli)

ते शनिवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट का धरण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला. राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी तळागाळातील लोकांसाठी काम केले. जर मेंढपाळाच्या मुलाने त्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले तर शरद पवार यांनी स्वत:च्याच हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट का धरला? हा मुद्दा केवळ पुतळ्याचा उद्घाटनाचा नाही. धनगर समाजाला फसवले गेल्यामुळे तो संतप्त झाला आहे. हीच फसवणारी माणसं आमच्या दैवताचं गुणगान गाणार असतील तर गोपीचंद पडळकर यांच्यासारखे वेडे पीर दोन हात करायला उभे राहतील, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.

‘आता सत्तेत आहात तर धनगर समाजाला आरक्षण का देत नाही?’

गेल्यावेळी भाजपची सत्ता होती तेव्हा धनगराच्या वेषात येऊन आरक्षण द्या, अशी मागणी करत होतात. मात्र, आता राज्याची सत्ता या लोकांच्या हातात आहे. तेव्हा धनगर समजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे (ST) आरक्षण द्यावे, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना लगावला.
अजून दोन-चार पुतळे उभे करा आणि त्यांचे उद्घाटन करा. त्यासाठी कोणीही नाही म्हणालेले नाही. काल गोपीचंद पडळकरांनी केलं, आज शरद पवारांनी उद्घाटन केलं, उद्या दुसंर कोणीतरी करेल, असेही खोत यांनी म्हटले.

पवारांसमोर जानकर म्हणाले, मराठा-धनगर एकत्र आल्यास, दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो!

मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी केले. महादेव जानकर यांनी हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. (If maratha and dhangar community make alliance we will win Delhi says Mahadev Jankar)

जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झाले. या कार्यक्रमाला होळकर घराण्याचे वंशज आणि छत्रपती संभाजीराजे हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन महादेव जानकर यांनी राजकीय फटकेबाजी केली. आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) असला तरी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या (ST) सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असे महादेव जानकर यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

आता होळकरांच्या वंशजांचीही शरद पवारांवर टीका, छत्रपती संभाजीराजेंनाही पाठवला संदेश

(Sadabhau khot slams Sharad Pawar in Sangli)