पिंपरी चिंचवड : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे अध्यक्ष संभाजी भिडे आणि त्यांची वादग्रस्त वक्तव्य हे समीकरण आता काही नवे राहिले नाही. यापूर्वी आंबे खाल्याने महिलांना मुले होतात असे विधान केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी एका महिला पत्रकाराला ‘आधी टिकली लाव मगच मी तुझ्याशी बोलतो.’ असे उत्तर दिल्याने राज्यातील वातावरण तापले होते. राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना त्या विधानावरून नोटीसही पाठवली होती. आता पुन्हा संभाजी भिडे यांनी देशातील एका मोठ्या पक्षाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
संभाजी भिडे यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची स्थापना केली. या संघटनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा हिंदुत्ववादी संघटनांना अभिप्रेत असलेला इतिहास संभाजी भिडे आपल्या भाषणातून सांगतात. पुण्यातील दिघी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने संभाजी भिडे यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी भिडे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा. ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण, रविन्द्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते असे संभाजी भिडे म्हणाले.
15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिवस नाही. या दिवशी फाळणी झाली होती. ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावर लटकवून घेतलं. वंदे मातरम म्हटलं ते व्यर्थ नाही. आता ठाम निर्धार करायचा. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मान्य पण ते हांडगं स्वातंत्र्य असेल. ते पत्करलं पाहिजे. या वर्षीपासून 9 च्या ठोक्याला भगवा झेंडा घ्यावा. छोटासा तिरंगाही दखलपात्र म्हणून घ्यावा असे विधान त्यांनी केले.
जोपर्यंत भारताचा राष्ट्रध्वज भगवा म्हणून स्विकारला जात नाही तोपर्यंत शांत बसायचे नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाईसारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल. तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्विकारणारी ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटी नाही तर ऑल इंडिया गांडू कमिटी आहे असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.