“एक का कल्याण करता दिल्ली को भेजता, दुसरे का बिस्मिल्ला करता भोकरदन मे बिठाता” अब्दुल सत्तार यांच्या विधानाने पुन्हा एकदा वाद

| Updated on: Oct 27, 2024 | 3:33 PM

Maharashatra Vidhansabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील निकालाचे पडसाद अजूनही जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उमटत आहे. ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या पराभवाने भाजपला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी या पराभवाचे उट्टे काढण्याचे संकेत दिले. आता अब्दुल सत्तार यांनी त्यांना पुन्हा चिमटा काढला आहे.

एक का कल्याण करता दिल्ली को भेजता, दुसरे का बिस्मिल्ला करता भोकरदन मे बिठाता अब्दुल सत्तार यांच्या विधानाने पुन्हा एकदा वाद
सिल्लोड मतदारसंघात वातावरण तापले
Follow us on

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे कवित्व अजूनही संपलेले नाही. मराठवाड्यात तीन ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. नांदेड, बीड आणि जालन्यात भाजपाला अनपेक्षित झटका बसला. या निकालाचे आकलन झाल्यावर रावसाहेब दानवे यांनी आगपाखड केली होती. त्यानंतर अब्दुल सत्तार आणि दानवे यांच्यात वितुष्ट आल्याचे समोर आले होते. त्यानंतर “एक का कल्याण करता दिल्ली को भेजता, दुसरे का बिस्मिल्ला करता भोकरदन मे बिठाता” असे वादग्रस्त वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण तापणार असल्याचे बोलले जात आहे. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात लवकरच त्याचे पडसाद उमटण्याची चर्चा होत आहे.

एकाला भोकरदनला बसवल

अब्दुल सत्तार यांचं रावसाहेब दानवे बद्दल वादग्रस्त विधान सध्या गाजत आहे. रावसाहेब दानवेचा बिस्मिल्ला केला आणि भोकरदनला बसवलं अशा स्वरूपाचे विधान त्यांनी केले. अब्दुल सत्तार यांनी कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे बद्दल विधान केले आहे. कल्याण काळेचं कल्याण केलं दिल्लीला पाठवलं तर रावसाहेब दानवेला भोकरदनला बसवलं, असा विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

राजकारणात ना कुणी शत्रू, ना कुणी मित्र

राजकारणात कुणी कुणाचा शत्रू अथवा मित्र नसतो. रावसाहेब दानवे यांना भोकरदनमध्ये सुद्धा मते मिळाली नाहीत. लोकसभेला मनोज जरांगे फॅक्टर होता. आमचे कार्यकर्ते यावेळी नाराजी होते. दानवे यांना मी ही गोष्ट बोलून दाखवली होती. आम्हाला शत्रू मानणाऱ्यांनी पैठण मधील मतांची बेरीज पाहावी असा टोला त्यांनी यापूर्वी रावसाहेब दानवे यांना लगावला होता. दानवे यांचा पराभव, जरांगे यांच्या नाराजीमुळे झाल्याचा दावा सत्तार यांनी केला होता.

कल्याण काळे यांना मदत केली मान्य करतो

कल्याण काळे माझे मित्र आहेत. त्यांना मदत केली हे मान्य करतो. दानवे हे भोकरदनमध्ये पण पिछाडीवर होते. आमचे कार्यकर्ते नाराज होते. माझ्या काही कार्यकर्त्यांनी कल्याण काळे यांना मदत केली, हे त्यांनी लोकसभा निकालानंतर मान्य केले होते. याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याचे ते म्हणाले होते. दानवे यांनी मला विधानसभेत मदत न केल्याची माझ्या कार्यकर्त्यांची नाराजी होती, असे ते म्हणाले होते. आता त्यांनी थेट आपल्यामुळेच दानवे घरी बसल्याचे वक्तव्य केले आहे.