दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर : राज्यात एकिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं पद कधीही जाणार असे दावे केले जात आहेत. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भूमिकेकडे सर्वांचं बारीक लक्ष आहे. शिंदे गटाच्या आमदाराने तर अजित पवार यांच्या विरोधी पक्षनेते पदाचं जणू काऊंटडाऊन सुरुच झालंय, असा दावा केलाय. 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे.मात्र या सभेला अजित पवार नसतील, असा खळबळजनक दावा करण्यात आलाय. संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी हा दावा केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
टीव्ही9 शी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ‘ एक तारखेच्या वज्रमुठ सभेत अजित पवारांची खुर्ची दिसणार नाही. अजित पवार लवकरच सरकारमध्ये सहभागी होणार आहेत, असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. मला एकवेळ मंत्रिपदाची हाव असू शकते, पण अजित पवारांना मंत्रिपदाची हाव नाही, असं वक्तव्यही शिरसाट यांनी केलंय.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीवरून राजकारण तापलंय. संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना आव्हान दिलंय. दम असेल तर संजय राऊत यांनी कर्नाटकात उध्दव ठाकरे यांच्या सभा घेऊन दाखवाव्यात,
रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरीला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांचं आंदोलन सुरु आहे. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ रिफायनरीला नागरिकांचा विरोध असेल तर त्याचा विचार केला पाहिजे. आमचा आग्रह नाही. पब्लिक आपल्या सोबत नसेल तर तो प्रोजेक्ट आणण्यात काहीही अर्थ नाही..
संभाजीनगरातील दंगल प्रकरणावरून पोलीस आयुक्तांची बदली झाली, याचं श्रेय अंबादास दानवे यांनी जाणार नाही, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय. ते म्हणाले, ‘ अंबादास दानवे यांच्यामुळे औरंगाबाद पोलीस आयुक्तांची बदली झालेली नाही. अंबादास दानवे यांचा हा इम्प्रेशन दाखवण्याचा प्रकार आहे, त्यांच्यामुळे काहीही घडलेलं नाही.
राज्यात एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जाण्यावरून जोरदार चर्चा सुरु आहेत. तर अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असतील, यावरूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवल्यानंतर काँग्रेसने नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनीही प्रतिक्रिया दिली. अजितदादांसारखा मुख्यमंत्री बघायला मला आवडेल, असं धंगेकर म्हणालेत.