आम्हाला पालकमंत्रिपद दिलं, तर शंभर टक्के…; भाजपने नेत्याच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा

| Updated on: Jun 30, 2024 | 5:44 PM

Atul Save on Chhatrapati Sambhajinagar Guardianship : छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदावरून भाजप नेत्याने महत्वाचं वक्तव्य केलं आहे. भाजपच नेते अतुल सावे यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. तसंच संजय राऊत यांच्याबाबतही त्यांनी विधान केलंय. वाचा सविस्तर...

आम्हाला पालकमंत्रिपद दिलं, तर शंभर टक्के...; भाजपने नेत्याच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा
अतुल सावे, भाजप नेते
Image Credit source: Facebook
Follow us on

छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदावरून भाजपच्या नेत्याने वक्तव्य केलं आहे. आम्हाला पालकमंत्रिपद दिलं. तर शंभर टक्के ते पद भुषवायला आवडेल, असं विधान छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. आम्हाला पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली तर आम्ही करणार नाही. तर आमचं काम असही चालूच आहे. जर आमचं पालकमंत्रिपद असतं तर आम्ही भांडून घेतलं असतं, असंही ते म्हणालेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांचं हे विधान चर्चेत आहे.

संजय राऊत आतापर्यंत जेवढे बोलले त्यापैकी 99% निर्णय त्यांचे खोटे ठरलेले आहे. रोज सकाळी उठायचं आणि नऊ वाजता टीव्हीवर बोलायचं. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर जास्त बोलणार नाही, असं म्हणत सावे यांनी संजय राऊत यांच्यावर शाब्दिक प्रतिहल्ला केला आहे.

वारीबाबत काय म्हणाले?

सध्या महाराष्ट्र पंढरपूरची वारी चालू आहे. या वारीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पालखी सोहळ्यातील प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये दिंडी याप्रमाणे बजेट देण्यात आलेला आहे. सध्या महाराष्ट्र पंढरपूरची वारी चालू आहे. या वारीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पालखी सोहळ्यातील प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये दिंडी याप्रमाणे बजेट देण्यात आलेला आहे, असंही अतुल सावे म्हणालेत.

राज्य सरकारच्या योजनांवर काय म्हणाले?

काल सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना मंजूर केलेली आहे. मुलींना मोफत शिक्षण, महिलांना दीड हजार रुपये प्रति महिन्याला, शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान देण्यात आलंय. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, मागल त्याला सौर पंप, शेतकऱ्यांना खंडित वीज पुरवठा,15 हजर कोटीचा प्रकल्प मंजूर करण्यात येणार आहे. जे अल्पसंख्यांक मुलं परदेशात शिक्षण घेतात. त्यांना या अर्थसंकल्पामध्ये त्यांना लागणारी शिष्यवृत्ती सरकार देणार आहे, अशी माहितीही अतुल सावे यांनी दिली आहे.