कोल्यातील काँग्रेसच्या प्रचारसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ आल्याचं नाना पटोले म्हणाले. काँग्रेस उमेदवार साजिदखान पठाण यांच्या प्रचारसभेत नाना पटोलेंचे वक्तव्य. केलं. नाना पटोलेंच्या वक्तव्याने नवा वाद सुरु असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. काहीही वादग्रस्त विधान नाही योग्य विधान आहे. तशीच स्थिती भाजपची झाली पाहिजे. कुत्र्यासारखे हाल भाजपचे केले पाहिजेत. भाजप जशी वागते तसेच बोलले पाहिजे, असं विधान अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकरांचं स्वागत करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रावसाहेब दानवेंनी एका कार्यकर्त्यांला लाथ मारल्याचा हा व्हीडिओ आहे. यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनोदाने पण लाथ मारणं चुकीचं आहे. यातून भारतीय जनता पार्टीची वृत्ती प्रगट होते, असं त्यांनी म्हटलं आहे.
सोयाबीनविषयी देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळपेक्षा कमी भाव आता आहे सोयाबीन ठेवावं की फेकून द्यावं अशी परिस्थिती आहे. सोयाबीनमध्ये एक रुपयाचा सुद्धा फायदा होत नाही. याला सरकार जबाबदार आहे. आयात निर्यात धोरण जबाबदार आहे. सोयाबीनचा प्रश्न ज्वलंत आहे कवडीमोल भावाने सोयाबीन घ्यायचं आणि व्यापाऱ्यांचा फायदा करून द्यायचा असं धोरण आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक होतील, असं अंबादास दानवे म्हणालेत.
राज ठाकरे नेमके कोणाच्या बाजूने आहे हे कळत नाही. भाजपच्या बाजूने की विरोधात हे कळत नाही. भाजपच्या बाजूने म्हटलं तर भाजपच्या मित्रांच्या विरोधात प्रचार करतात. त्यामुळे ते बोलत असतील त्यांच्या त्या शुभकामना समजाव्या. राज ठाकरे पुत्र प्रेमासाठी बोलत असतील. मात्र निवडणुकित जे व्हायचं ते होईल लढलं पाहिजे निवडणूक लढवणं मर्दानगीच लक्षण असतं, असं अंबादास दानवे म्हणालेत.
राहुल गांधी सत्य बोलतायेत. भारतीय जनता पार्टीच्या सहा लोकसभेच्या खासदारांनी संविधान बदलण्याचं वक्तव्य केलं आहे. आताची वृत्ती भाजपची काय आहे. भाजप संविधानाने वागत नाही सगळे कायदे वाकडेतिकडे केले आहेत. संविधानाची पायमल्ली भाजपने केली आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.