मराठा नेत्यांनो.. लक्ष द्या, नाही तर उद्या तुम्ही… मनोज जरांगे पाटील यांचा मराठा नेत्यांना आवाहन आणि इशारा काय?

| Updated on: Nov 07, 2023 | 11:36 AM

Manoj Jarange Patil on Maratha Leaders and Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांना आवाहन केलं हे. तसंच या मराठा नेत्यांना त्यांनी इशाराही दिला आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवरही गंभीर आरोप केलेत. मराठा समाजालाही त्यांनी आवाहन केलं आहे.

मराठा नेत्यांनो.. लक्ष द्या, नाही तर उद्या तुम्ही... मनोज जरांगे पाटील यांचा मराठा नेत्यांना आवाहन आणि इशारा काय?
andolak Manoj Jarange Patil
Follow us on

दत्ता कानवटे, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 07 नोव्हेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील… मराठा आरक्षणासाठी ते लढा देत आहेत. आता ते अधिक आक्रमक झाल्याचं दिसतं आहे. ओबीसींनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याला विरोध केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं आहे. तर मराठा नेत्यांना त्यांनी आवाहन केलंय. तसंच गंभीर इशाराही दिलाय. मराठ्यांच्या पोरांवर खोटेनाटे डाव टाकले जात आहेत. केसेस दाखल केल्या जात आहेत. मराठा नेत्यांनी मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.नाहीतर आम्हाला शांततेत का होईना पूर्वीच्या भूमिकेवर यावेच लागणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मराठा नेत्यांना आवाहन- इशारा काय?

मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं आपण केलं तर मागे हटतील. शांततेत आंदोलन सुरू आहेत, त्यामुळे त्यांना रोखता येत नाही, म्हणून मराठ्यांच्या पोरांवर खोटेनाटे डाव टाकले जात आहेत. केसेस दाखल केल्या जात आहेत. हे थांबवा. तुम्ही नाही थांबवलं तर आम्ही समर्थ आहोत. आम्हालाही पुढचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. आमच्यापुढे पर्याय नाहीत, असं जरांगे म्हणाले.

राजकीय नेत्यांनी आमच्या गावात तुम्ही यायचं नाही. या प्रक्रियेकडे आम्हाला परत येण्याची वेळ देऊ नका. त्यामुळे मराठा नेत्यांनी मराठ्यांच्या पोरांच्या पाठी उभे राहा. ओबीसी नेते जाहीर उभे आहेत. तुम्हीही राहा. तुम्ही नाही राहिले तर आम्ही खंबीर आहोत. तुम्ही उभं राहिला नाही तर आम्हाला कोणत्या नेत्याफित्याची काही गरज नाही. बघा मग आम्हाला शांततेत का होईना पूर्वीच्या भूमिकेवर यावेच लागणार आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

“उद्यापर्यंत वाट बघणार नाहीतर…”

सीएमओ ऑफिसमधून रात्री फोन आला होता. उद्या सरकारचं शिष्टमंडळ मला भेटायला येणार आहे. बघू… उद्या शेवटची वाट बघतो. ते झुलवतात. पण त्यांनी कारणही सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरला गेले म्हणून परवा येतो म्हणाले. त्यामुळे वाट बघू… उद्याची आम्ही वाट बघू. नाही तर मग आम्हीही पुढची भूमिका घेऊ, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.