विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. महायुतीच्या जागा वाटपावर बोलताना अंबादास दानवे यांनी मोठा दावा केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज अजित पवार गटाची बैठक झाली आहे. अजित पवार गटातील अर्ध्या लोकांनी महायुती करायला विरोध केला आहे. त्यामुळे महायुतीचं जागावाटप झालं. या कपोल कल्पित तुमच्या बातम्या आहेत. अजून कोणत्याच पक्षाचे काहीही सुरू झालेले नाही. त्यामुळे मला असं वाटतं, अजून कोणत्याच पक्षाचे जागावाटप झालेलं नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
निवडणूक आयोगाने जो अहवाल मागवला आहे. ते त्याच वेळेस केले असते. तर चांगलं झालं असतं. पण तरी काही हरकत नाही ‘देर आहे दुरुस्त आये’ येणाऱ्या विधानसभेत असे काही होऊ नये याची खबरदारी निवडणूक आयोगाने घ्यावी, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
दुश्मन कोण आहे हे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले असतं. मराठा त्यांचे दुश्मन आहेत का…? हे स्पष्ट केलं असतं. तर बरं झालं असतं. तर ‘दिलबर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम’ तर तुमचे दुश्मन कोण आहे ही भूमिका छगन भुजबळ साहेबांनी स्पष्ट करावी, असं आव्हानही अंबादास दानवे यांनी छगन भुजबळांना दिलं आहे.
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणापाठोपाठ मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. यावरही अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षण हे जातीसाठी असतं. ते धर्मासाठी नसतं. मुसलमानाची एखादी जात कुणबी असेल. मुसलमानात कुणबी आहेत. मुसलमानातील जातीला आरक्षण आहे. परंतु धर्माला नाही. त्यामुळे एखाद्या धर्मामध्ये अशी जात असेल तर त्यांना कुणबी आरक्षण मिळतं. मुस्लिमांना आरक्षण मुद्दा येत नाही परंतु मुस्लिमातील जातींना आरक्षण आहे, असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.