महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. परवा दिवशी निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळी समीकरणं चर्चेत आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनीही अशा प्रकारचं विधान केलं होतं. कधीही काहीही होऊ शकतं असं मलिक म्हणाले होते. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी सूचक विधान केलं आहे.
शरद पवार यांच्यासोबत जायचं की नाही? याचा निर्णय एकनाथ शिंदेच करू शकतील. आम्हाला यावर भाष्य करता येणार नाही. एकनाथ शिंदेसाहेब योग्य दिशेने जात असतात. आम्ही त्यांचा शर्ट पकडून जाऊ. एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील. तो आम्हाला मान्य. ते जिकडं जातील तिकडं आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत, असं शिरसाट म्हणाले.
महायुतीचे नेते एकत्रित बसून मुख्यमंत्री कोण हे ठरवणार आहेत. 75% सर्वे आमच्या बाजूने आहेत. एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणूक लढत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असा आम्हाला विश्वास आहे. नितीश कुमारांचं उदाहरण पाहिलं तर तरीही मुख्यमंत्री आहेत. वरिष्ठांनी तो निर्णय घ्यायचा आहे. सर्व सामान्यांची भावना ती आहे एकनाथ शिंदे ज्या भावनेनं काम करतात ते लोकांना आवडलं आहे. लाडकी बहिण योजना इतकी पावरफुल झाली की महिला आनंदी आहेत, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
यंदाच्या निवजणुकीत वोट जिहादचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावर शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा व्होट जिहाद सुरू होता आमच धर्मयुध्द लढत होतो. आमचं धर्मयुध्द सक्सेस झालं आहे, बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं हे यशस्वी झालं आहे. भाजप आमचा मोठा भाऊ आहे, मोठा भाऊ छोट्याभावाल सहकार्य करतो, असं शिरसाट म्हणालेत.