माजी खासदार, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आज तिरंगा संविधान रॅली काढली आहे. छत्रपती संभाजीनगर ते मुंबईपर्यंत तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली आहे. मोहम्मद पैगंबर यांची निंदा करण्यात आली. याविरोधात ही रॅली काढण्यात आली आहे. रॅलीत हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले आहेत. रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. मुंबईत रॅली पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्याना संविधान देण्यात येणार आहे.
आम्ही हजारो गाड्या घेऊन मुंबईला निघालो आहोत. रामगिरी सारखा महाराज आणि नितेश राणे काहीही बोलत आहेत. आमच्या प्रेषित पैगंबराची निंदा करत आहेत. हे गुंडांचे राज्य नाही हे संविधानाने चालणारा राज्य आहे… यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देणार आहोत, असं इम्तियाज जलील यांनी यावेळी म्हटलं आहे.
आजची ही तिरंगा रॅली आमची एमआयएम म्हणून निघालेली नाही तर आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी मिळून काढलेली आहे. आम्ही कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात निघालेलो नाही तर हे कायद्याचं राज्य आहे. रामगिरी आणि नितेश राणे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे, असं जलील म्हणाले.
मुंबईतील धारावी भागात मस्जिदचा अनधिकृत भाग महापालिकेकडून पाडण्यात आला. त्यानंतर मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला. धारावी पोलील स्टेशनला घेराव घातला. या सगळ्यावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी प्रक्षोभक विधान केलं. त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला जात आहे. एकाबाजूला संविधान बचाव म्हणतता आणि कायद्यानुसार अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ते तोडण्यासाठी टीम आली. त्यावेळी तिथल्या जिहाद्यांनी अतिक्रमण तोडू दिलं नाही. पालिकेच्या गाड्या फोडल्या. ही जी काय अरेरावी, दादागिरी आहे, ती त्यांच्या पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये जाऊन दाखवावी, असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच विधानावर इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला आहे.