औरंगाबाद : राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. तर आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार औरंगाबादमध्ये आले असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना त्यांच्या धोरणांची आणि त्यांच्या कृत्तींची आठवण करुन देत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठेपण अधोरेखित केले.
शरद पवार यांनी बोलताना सांगितले की, हे राज्य रयतेचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी आपल्या धोरणातून आणि कृतीतून दाखवून दिलं आहे.
त्यामुळे राज्यानेच नाही तर देशाने शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
शिवाजी महाराजांचे राज्य भोसल्यांचं राज्य म्हणून ओळखले गेले नाही तर हे राज्य रयतेचे राज्य म्हणून ओळखले गेले असल्याचे सांगत त्यांच्या धोरणांची एक वेगळी ओळख त्यांनी करुन दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी अनेक प्रवास केले ज्या ज्या ठिकाणी गेल्यावर त्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात आणि त्यांच्याविषयीच ज्यावेळी विचारले जाते त्यावेळी साहजिकच आपल्याला त्याचा अभिमान वाटतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार यांनी इतिहासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक आठवणही त्यांनी सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलसंपदा आणि ऊर्जामंत्री होते, त्यावेळी त्यांनी काही महत्वाची धरणे बांधली, त्यातले एक महत्वाचा भाग म्हणजे भाकरा नांगल प्रकल्प हा आहे.
त्यावेळी तिथे वीज निर्माण करून दारिद्रय निर्मूलनाचे प्रयत्न केले गेले, पावर कॉर्पोरेशन त्यांनी तयार केले असे मोठ मोठे निर्णय त्यांनी घेतले आणि सामाजिक असेट त्यांनी निर्माण केला तर छत्रपती शाहू महाराज यांनी दलितांची एक परिषद त्यातून एक नवी सामाजिक चळवळ शाहू महाराज यांनी निर्माण केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.