महायुतीच्या जागावाटप संदर्भात मुख्यमंत्री यांच्या बैठकी सुरू आहे. सर्व जागा निवडून येईल अशी रणनीती आहे. 2 दिवसात कोण कुठली जागा लढवणार हे स्पष्ट होईल. नाशिक, सिंधुदूर्ग, छत्रपती संभाजीनगर या 3 ही जागा आमच्याच असेल असा आमचा अंदाज आहे. 2 तारखेपासून नेत्यांचे दौरे सुरू होतील. त्या चर्चा असणाऱ्या 3 ही जागा आम्हालाच मिळतील. भाजपने 24 जागा जाहीर केल्या आहेत. उर्वरित जागा तयारी झालीय. आम्ही 16 ते 18 जागा लढवण्याचा तयारीत आहोत. 16 पेक्षा कमी जागा आम्हाला मिळणार नाहीत, असं विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगरची जागा महत्वाची आहे. इथून शिवसेनाप्रमुखांनी सुरुवात केली होती. कालच बैठक झाली आहे. ही जागा शिवसैनिकाला सुटावी अशी आमची मागणी आहे , अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. 8 उमेदवार दिले आहेत. कुणी कमजोर वाटत असेल तर मुख्यमंत्री कधीही उमेदवार बदलू शकतात. त्याची शक्यता नाकारता येत नाही, असं संजय शिरसाट म्हणालेत.
सुनीत तटकरे काय जाहीर करतील माहीत नाही. मात्र नाशिकची जागा आम्हाला मिळेल. आम्ही ती घेणारच आहोत. काँग्रेसचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात आहेत. सतत असतात. रोहित पवार कुठं काय बोलतात हे त्यांनाच कळत नाहीय ते जोरात जोमात आणि काही दिवसांनी कोमात असेल. राजकारणातील ते केष्टो मुखर्जी आहेत… कुणाला ते काय बोलतील याचा नेम नाही, असं म्हणत शिरसाटांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
काल दिल्लीत टोमण्याचा नवा प्रयोग झाला. वस्तुस्थिती अशी होती की भाषणाला शून्य प्रतिसाद होता. क्रमवारी पहिली तर स्वाभिमान कुठं गेला ते दिसले. आता तुमची जागा खूप खाली गेलीय. त्यांचे दर्शन आता तुम्हाला घ्यावे लागेल आता पुन्हा स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत, असं म्हणत संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाला टोला लगावला आहे.