“बजरंगबलीनेच भाजपला चारी मुंड्या चित केलं”; काँग्रेसने हनुमान मंदिरात आरती करून भाजपला थेट उत्तरच दिलं

| Updated on: May 13, 2023 | 8:30 PM

कुठल्याही निवडणुकीत धर्म आणायला नको होता, मात्र भाजपने राम-रहिम यांच्या नावावर राजकारण केलं आहे असा गंभीर आरोपही काँग्रेसने त्यांच्यावर केला आहे.

बजरंगबलीनेच भाजपला चारी मुंड्या चित केलं; काँग्रेसने हनुमान मंदिरात आरती करून भाजपला थेट उत्तरच दिलं
Follow us on

छत्रपती संभाजीनगर : कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहिर होताच, राज्यातील भाजप आणि काँग्रेस आता आमनेसामने आले आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राज्यातील काँग्रेसने धर्माच्या नावावरून भाजपने कर्नाटकात राजकारण केले असल्याचा गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता धर्माच्या नावावरून भाजप राजकारण करत आहेत, अशी टीका आता विरोधकांकडून भाजपवर केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार करताना बजरंगबलीच्या नावाने काँग्रेसवर टीका करत धार्मिक मुद्दा उपस्थित केला होता. तर बेळगावमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बजरंगबली, हिंदू-मुस्लिम हे विषय त्यांनी प्रचारात महत्वाचे मुद्दे बनवले होते.

त्यावरून आता काँग्रेसने भाजपवर निशाणा साधताना सडकून टीका केली आहे. काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, आज शनिवार आहे,

त्यामुळे बजरंगबलीचाच दिवस आहे त्यामुळे बजरंगबलीने भाजपला चारीमुंड्या चित केले असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी भाजपवर हल्लाबोल करताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

कर्नाटक विधानसभेची निवडणुकीत काँग्रेसचा विजय होताच महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसने जोरदार जल्लोष केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी गुलमंडी परिसरातील सुपारी हनुमान मंदिरात आरती करुन काँग्रेसने भाजपलाच थेट प्रत्युत्तर दिले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर काँग्रेसने आज छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी परिसरातील सुपारी हनुमान मंदिरात आरती केली.

यावेळी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा सादत आज बजरंगबलीचा दिवस आहे.

त्यामुळे बजरंगबलीनेच भाजपला चारीमुंड्या चित केले आहे अशा शब्दात त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच भाजप कर्नाटकमध्ये लूट करून राज्य करत होतं.

कुठल्याही निवडणुकीत धर्म आणायला नको होता, मात्र भाजपने राम-रहिम यांच्या नावावर राजकारण केलं आहे असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

तसेच येणाऱ्या 2024 च्या महाराष्ट्रातील निवडणुकीत काँग्रेस हा महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष राहिल असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.