“एकनाथ शिंदे यांना वाटते, फडणवीसांनी केंद्रात जावे”; ही शक्यता नेमकी कोणी वर्तवली…

| Updated on: Jun 15, 2023 | 5:26 PM

येणाऱ्या लोकसभा अधिवेशनात मी नितीन गडकरी यांना याबाबत प्रश्न विचारणार आहे. 490 कोटी रुपयांचे काम 270 कोटी रुपयांमध्ये कसे काय काम होणार आहे? असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

एकनाथ शिंदे यांना वाटते, फडणवीसांनी केंद्रात जावे; ही शक्यता नेमकी कोणी वर्तवली...
Follow us on

औरंगाबाद : इम्तियाज जलील 121 -गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहिरातीमुळे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या टीका होत आहेत. त्यामुळेच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कौतुक करत एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाविषयीही त्यांनी मत व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांना कुठेतरी वाटत असावे की, देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावे आणि आपण राज्यात राहाव.

त्यामुळे ही जाहिरात दिली असावी, प्रत्येकाची एक महत्वकांक्षा असते त्यातून हे घडलं असावं असा खोचक टोला खासदार जलील यांनी त्यांना लगावला आहे.

फडणवीस केंद्रात

यावेळी जलील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना म्हटले आहे की, फडणवीस हे केंद्रात खूप चांगले काम करू शकतात. त्यांचं भविष्यसुद्धा केंद्रातच आहे. त्यातच नरेंद्र मोदी नंतर भाजपची सर्वात चॉईस हे फडणवीस आहेत. तर त्यांचे नेतृत्व देशाला सांभाळू शकते. योगी आणि फडणवीस यांच्यात फडणवीस ही चांगली चॉईस असू शकते.

त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. त्यातच या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस या कारणामुळे नाराजही होऊ शकतात कारण तेही मुख्यमंत्री राहिलेले आहेत असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

पाणी का दिलं नाही

तर पाणी प्रश्नावरून खासदार भागवत कराड यांच्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी 2014 ला पाणी का दिलं नाही. जी पाणीपुरवठा योजना 700 कोटी रुपयात पूर्ण झाली असती पण ती आज 2 हजार 700 कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. काहीही झालं तरी 2024पर्यंत पाणी येणार नाही, पाणी पुरवठा योजना पाहायला मलाही घेऊन गेले असते तर बरं झालं असतं असा टोला त्यांनी भागवत कराड यांना लगावला आहे.

‘ते’ काम मंत्र्याच्या भावाला

औरंगाबाद-पैठण रस्त्याचे काम 41 टक्के बिलोने का घेतले आहे? तर हे काम भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या भावाला देण्यात आले आहे. त्यामुळे या विरोधात मी आवाज उठवणार असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे. येणाऱ्या लोकसभा अधिवेशनात मी नितीन गडकरी यांना याबाबत प्रश्न विचारणार आहे. 490 कोटी रुपयांचे काम 270 कोटी रुपयांमध्ये कसे काय काम होणार आहे? असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला आहे.