नोकऱ्यांची मिटली भाऊ चिंता, ऑरिक सिटीत लवकरच दाखल होणार ‘टोयोटा’, मराठवाड्याला विकासाचा बुस्टर डोस

| Updated on: Jul 31, 2024 | 2:31 PM

Marathwada Investment : मराठवाड्याच्या विकासाला पुन्हा एकदा विकासाचा डोस देण्याचा प्रयत्न होत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये नवीन प्रकल्प येऊ घातले आहे. टोयोटासह इतर काही प्रकल्पांची नांदी होत आहे.

नोकऱ्यांची मिटली भाऊ चिंता, ऑरिक सिटीत लवकरच दाखल होणार टोयोटा, मराठवाड्याला विकासाचा बुस्टर डोस
मराठवाड्यात विकासाचा सूर्य
Follow us on

दुष्काळ कायम पाचवीला पुजलेल्या मराठवाड्यासाठी राज्य सरकारने गुड न्यूज आणली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नवनवीन प्रकल्प येऊ घातले आहे. ऑरिक सिटीसह नव्याने विकसीत होत असलेल्या बिडकीन परिसरातील अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न महायुती सरकारने सुरु केला आहे. ऑरिक सिटी हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. नागपूरच्या मिहानच्या धरतीवर या प्रकल्पाला जागतिक नकाशावर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

20 हजार कोटींची गुंतवणूक

छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये जपान दौऱ्यावर असताना या प्रकल्पाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती. कंपनीसमोर गुजरात, तमिळनाडू आणि महाराष्ट्र असे तीन पर्याय होते. कंपनीने महाराष्ट्राला पसंती दिली. त्यामुळे आता ऑरिक सिटीमध्ये ही कंपनी प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे मराठवाड्यात रोजगार वाढीस लागतील.

हे सुद्धा वाचा

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

– जपानच्या टोयोटाची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक
– छत्रपती संभाजीनगर येथे 20,000 कोटींची गुंतवणूक, 8000 रोजगार निर्मिती मराठवाड्याच्या अर्थकारणाला चालना
– ऑटोमोबाईल क्षेत्रात महाराष्ट्राचा वरचष्मा कायम, हा प्रकल्प ग्रीनफिल्ड असणार
– महाराष्ट्र गुंतवणुकीचे क्रमांक 1 चे राज्य, सातत्याने एफडीआयमध्ये नंबर 1
– देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून टोयोटाच्या संपर्कात होते, आज प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती
– ⁠ऑरिक सिटीमध्ये 850 एकरमध्ये साकारणार प्रकल्प

ही तर मोठी आनंदाची बातमी

छत्रपती संभाजीनगरसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. टोयोटा किर्लोस्करनं २० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे टोयोटा किर्लोस्करच्या माध्यमातून थेट ८ हजार जणांना रोजगार मिळणार आहे, इलेक्ट्रीक व्हेईकल आणि ऑटोमोबाईल मधील ही गुंतवणूक आहे. संभाजीनगरची निवड त्यांनी केली ही आनंदाची गोष्ट आहे. कर्नाटकात ते प्रत्यक्ष प्रेजेन्ट असतानाही त्यांनी राज्याची निवड केली ही आनंदाची गोष्ट आहे. मोठी गुंतवणूक आल्याने मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळणार आहेअशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.