माजी खासदार, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी हिमाचलमधील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार कंगना रनौत यांच्यावर टीका केली आहे. पहिल्यांदा लोकसभा पाहायला मिळतेय. म्हणून काहीही बोलायचं… मीडियाच्या लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी अनेक लोक असे बोलतात. यादी भाजपची अमरावतीची खासदार होती. तिला माहीत होतं की आपण काहीतरी वेगळं बोललं की मीडियात आपल्याला दाखवतात. मात्र सगळ्यांना माहित आहे की काय झालं. आता ही नवीन बाई आली आहे दररोज काही ना काही तरी बडबड करते, असं इम्तियाज जलील म्हणालेत.
सगळ्यात जास्त यशाचा कारभार हिमाचलमध्ये चालतो. आणि कंगना रनौत या तर तिथल्या खासदार आहेत. दुसऱ्यावर बोट दाखवताना कंगना रनौतने आपल्या राज्यात कशाप्रकारे ड्रग्सचा आणि नशेचा कसा कारभार चालतो. त्यावर लक्ष दिलं तर चांगलं होईल, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी कंगना रनौत यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनोज जरांगे पाटील आणि एमआयएमची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावरही जलील यांनी भाष्य केलंय. जातीच्या आधारावर निवडणुका लढायला सुरुवात केली. तर हा देश, हे राज्य कुठे जाईल माहित नाही? आपण सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन एकत्र राहिले तर हा चांगला प्रयोग असेल. सगळ्या जातीत चांगले लोक असून तुम्ही सगळ्यांना संधी दिली तर चांगला प्रयोग असेल, असं इम्तियाज जलील म्हणाले.
विविध पक्षांच्या नेत्यांच्या इम्तियाज जलील यांच्यासोबत भेटीगाठी वाढल्या आहेत. अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुर्राणींनी इम्तियाज जलील यांची भेट घेतली. बाबाजानी दुर्राणी आणि जलील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींनी जलील यांची भेट घेतली. इम्तियाज जलील-अब्दुल सत्तारांच्या भेटीचं कारण आहे? यावर जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मित्रता असते, अनेक वर्षांपासून ते माझे मित्र आहेत. मित्रता जपायला पाहिजे. अब्दुल सत्तार जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यांचा सत्कार करायचा होता. तर ते तिथून जात असताना मग आम्ही त्यांना बोलावले. तर मग मी त्यांना चहा पिण्यासाठी बोलावलं होतं. बाबाजानी दुर्राणी आमचे वैयक्तिक मित्र आहेत. त्यामुळे घरगुती स्वरूपाची ही भेट झाली, असं जलील म्हणाले.