छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गट आणि शिवसेना यांचा वाद दिवसेंदिवस वाढत जाताना दिसून येत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप केले जात असले तरी, निवडणुकीवरून आता दोन्ही गट गेल्या काही दिवसांपासून आमनेसामने आले आहेत. मुंबई महानगरपालिका, बाजार समिती, पोटनिवडणुकांतून ठाकरे गट आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून जोरदार जय्यत तयारी केली असली तरी आरोप प्रत्यारोप करायचे काही थांबता थांबत नाहीत. त्यामुळेच आता ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या ही मागणी आम्ही करतो आहे असं थेट आव्हानही त्यांनी केले आहे.
त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचंड मोठी लढत होणार असल्याचे दिसून येणार आहे.
अंबादास दानवे यांनी ज्या प्रमाणे शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसाच त्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला आहे.
या निवडणुका भारतीय जनता पार्टी काही तांत्रिक कारणामुळे या निवडणुका पुढे ढकलते आहे असा आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे.
यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, निवडणुकीला आम्ही घाबरत नाही तर निवडणुकीला भारतीय जनता पार्टी घाबरते आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पार्टीला थेट आव्हान देत घोडा मैदान जवळ आहे किती निवडून येणार हे मुंबईची जनता निश्चित दाखवून देईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेत कोणाला किती जागा मिळतील या बोलण्याला आता सध्या अर्थ नाही कारण महापालिकेच्या मैदानात तुम्ही यायची तयारी करा आम्ही तयारी केलेली आहे अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावलं आहे.
नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती, त्यावर बोलताना दानवे यांनी सांगितले की, मला त्यावर बोलायचं नाही.
त्याचे उत्तर मी चॅनलवर देऊ शकत नाही, तसेच नितेश राणेंना उत्तर जिथे द्यायचे तिथेच उत्तर दिले जाईल अशा शब्दात त्यांनी त्यांना सांगितले आहे.
महाराष्ट्रातील नेतृत्व अकार्यक्षम, कुचकामी यांच्यामध्ये दम नाही, ताकद नाही अशा टीका केल्या जात असल्या तरी भाजपला केंद्राच्या नेतृत्वाला साध्या साध्या निवडणुकांसाठी या ठिकाणी यावे लागते यावरून त्यांना किती विश्वास आहे हेही त्यांना कळून चुकले आहे.
त्यामुळेच आम्हीही त्यांची वाट बघत आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतच भारतीय जनता पार्टीला लोकं जागा दाखवतील.
त्यामुळे त्याआधीच त्यांच्याकडून भारतीय जनता पार्टीला बडवून चढवून दाखवण्याची सवय लागली आहे अशा शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.