‘…तर मुंबईत येऊ, तुमची बंदूकफंदूकही चालणार नाही’; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

| Updated on: Jul 13, 2024 | 8:51 PM

मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून परत एकदा आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. संभाजीनगरमधील भाषणामध्ये बोलताना जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

...तर मुंबईत येऊ, तुमची बंदूकफंदूकही चालणार नाही; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील
Follow us on

आजची रात्र सरकारच्या हातात आहे. आम्ही सर्व मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेणार नाही. मी थेट विषयाला हात घालणार आहे. मीही आता दमलोय. आम्ही दिलेल्या 9 मागण्या पूर्ण करा. त्या गैबण्याच्या छगन भुजबळांच्या नादी लागू नका. त्याच्या नादी लागून तुमचे पक्ष बंद पडेल आणि सत्ताही जाईल, त्यामुळे त्याच्या नादी लागू नका, असं म्हणत मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

मला उद्या दुपारी रिंगण सोहळ्याला सोलापूरला जाणार आहे. वाकरीला जाणार आहे. माऊलीच्या दर्शनाला जाणार आहे. मला उद्या दुपारी 12 वाजता जायचे आहे. पहिल्या टप्प्याचा हा समारोप आहे. एवढा मोठा झालाय. मुंबईत गेल्यावर कसं होईल. शिंदे साहेब फडणवीस साहेब हे लोक मुंबईला येऊ शकतात. तुमची बंदूक फंदूक काहीच करणार नाही या मराठ्याच्या वादळापुढे सरकारने 13 तारीख घेतली. सरकारच्या हाती आजची रात्र आहे. आमचा अंत पाहू नका, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठ्यांनो शांत राहा. मी तुम्हाला आरक्षण मिळवून देतो. संभाजीनगरात आलात. तसंच शांततेनं जायचं आहे. कुठे काडीही मोडली नाही पाहिजे. सरकारने आज रात्रीतून विचार करा. मी उद्याच निर्णय घेणार होतो. संभाजी नगरातच निर्णय घेणार होतो. उद्याच्या उद्या निर्णय होणार होता. पण उद्या दुपारी मला माऊलीच्या दर्शनाला जायचं आहे. 16 तारखेला परत येणार आहे. 17 तारखेला श्रीक्षेत्र नारायण गडावर विठू रायाची पूजा ठेवली आहे माझ्या हस्ते. त्यामुळे 17 तारीख गेली. आता 18 आणि 19 तारीखच माझ्या हाती आहे. मला राजकारणात जायचं नाही. आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचं आहे. आम्हाला आरक्षण द्या. तुमच्या राजकारणाशी घेणंदेणं नसल्याचं जरांगे म्हणाले.

मी येडा आहे. पण आरक्षण दिलं ना मिळवून. भुजबळ पायावर चालत असेल मी डोक्यावर चालतो. पण माझ्यामुळे तुला औषधे सुरू केली ना. फडणवीस साहेब शिंदे साहेब आरक्षण द्या. ही गर्दी फक्त संभाजीनगराची आहे. राज्यातील मराठ्यांची लाट निघाली ना तर चालायला मोठी जागा लागेल, असं जरांगेंनी म्हटलं आहे.