विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील राजकीय समीकरणं बदलत आहेत. अनेक नेते पक्षांतर करत आहेत. अशातच माजी केंद्रीय मंत्र्यांची लेक आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिंदे गटाकडून संजना जाधव छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड विधानसभा निवडणुक लढवणार आहेत. शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत.
रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आजच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजना यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. संजना जाधव या शिंदे गटाकडून कन्नड विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. शिंदे गटाकडून संजना जाधव यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. आज मुंबईत संजना जाधव यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. त्यानंतर संजना जाधव यांची उमेदवारी जाहीर होईल आणि त्या कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल करतील.
संजना जाधव या भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या त्या विभक्त पत्नी आहेत. कन्नडच्या राजकारणात त्या सक्रीय सहभागी असतात. कन्नड तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भाजपकडून लढण्यासाठी संजना जाधव या प्रयत्न करत होत्या. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला आली. त्यामुळे संजना जाधव या शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांचा पत्ता कट होणार आहे.
कन्नड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराचं जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. अपक्ष उमेदवार मनोज पवार यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे. हजारो लोकांची गर्दी जमवत केला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मनोज पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती. कन्नड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांना मनोज पवार आव्हान देणार आहेत.