राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळेच पक्ष तयारी करत आहेत. आमचीच सत्ता येणार, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे यांनी हे कबूल केलं की महायुतीची सत्ता येणार मुख्यमंत्री कोण होणार. ते म्हणाले की महायुतीची सत्ता आल्यास भाजपचा मुख्यमंत्री होईल. पण यापेक्षा महायुतीची सत्ता येणार याला आम्ही महत्त्व देतो आणि मुख्यमंत्री निवडून आलेल्या संख्येनुसार ठरणार आहे. राज ठाकरे यांच्याकडे आम्ही पॉझिटिव्ह अँगलने पाहतो, असं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणालेत.
राज ठाकरे यांचा पक्ष वेगळा त्यांचा झेंडा वेगळा आहे. त्यांनी त्यांची निशाणी कमावलेली आहे. आम्ही निशाणी ढापलेली नाही. आम्ही मुळात शिवसेना सोडलेलीच नाही. आमची शिवसेना शिवसेनाप्रमुखांची शिवसेना आहे. झेंडा आमच्याकडे आहे निशाणी आमच्याकडे आहे त्यामुळे आम्ही ढापण्याचा प्रश्नच येत नाही, असंही संजय शिरसाट म्हणालेत.
अमित ठाकरे काय बोलले त्यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेऊ नका. त्यांची निवडणूक आहे जे जे होईल ते लढण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे. आम्हाला ना खंत आहे ना खेद आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे गरजेचे नाही. निवडणुकीमध्ये जे जे काय होते ते पाहणं महत्त्वाचं आहे. चार तारखेनंतर कोण कोणाला पाठिंबा देते हे बघितलं पाहिजे आहे. माहीमच्या जागेबाबत सदा सरवणकरांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणे शक्य नाही. देवेंद्र फडणवीस यांना महायुतीचं काम करावं लागेल. जो काही निर्णय होईल तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही बंधनकारक असेल, असं विधानही संजय शिरसाटांनी केलं आहे.
संजय राऊत यांचे फटाके विजल्यामुळे ते दुसऱ्यांच्या फटाक्याकडे पाहत आहेत. आता आवाज एवढा दणदणीत होईल की त्या आवाजाला संजय राऊतच्या कानठाळ्या बसणार आहेत. संजय राऊत हा घरफोड्या माणूस आहे. तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जे केलं ते काय होतं दुसऱ्यांनी भाजपसोबत गेले की हा बोलतो. संजय राऊत डोक्यावर पडलेला माणूस आहे. त्याला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये गरज पडू शकतो किंवा पागल खाण्यामध्ये गरज पडू शकते, असं संजय शिरसाट म्हणालेत.