विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चा होत आहे. जर महाविकास आघाडीचं सरकार आलं, तर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? ते घोषित करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांच्या या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाबाबत ठरवू असं शरद पवार म्हणाले. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांनी शिवसेना ठाकरे गट संपवल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाहीत, हे त्यांनी अधोरेखित केलं आहे. हे समजायला जास्त मेंदूची गरज नाही. मात्र त्यांचा मेंदू सडलेला आहे. शरद पवारांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘स्लो पॉयझन’ने संपवलं आहे. हे त्यांच्या लक्षात येत नाही, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी आज अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केल आहे. त्यालाही शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलंय. गणेशोत्सवा मध्ये देखील हे मूर्खासारखे स्टेटमेंट करत आहे. असं वक्तव्य फक्त संजय राऊत बोलू शकतात. लालबागचा राजा हा काय महापौर बंगला वाटला काय? जे महापौर बंगल्याचे वैभव होते. ते आता कुठे आहे? स्वतः काय खाल्लं त्याकडे लक्ष द्या लोकांना नाव ठेवू नका. लालबागच्या राजाचे दर्शन घ्या. अमित शाह आज येत नाही. हे भावना दुखण्याचा प्रयत्न करत असून लोकांना हे हीनावण्याचं प्रयत्न करत आहे, असं शिरसाटांनी म्हटलंय.
शिवसेना शिंदे गटाला अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढायचा आहे, असं विधान राष्ट्रवादी शरद गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. त्याला शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलंय. आम्हाला कोणालाही बाहेर काढायचं नाही. अजित पवार हे मजबुतीने महायुतीतच आहेत. मात्र यांना वाटतं अजित पवार बाहेर जाऊन महायुतीत फूट पडावी. तसं काही घडणार नाही अजित पवार महायुतीतच आहेत, असं संजय शिरसाट म्हणालेत.