‘मी चंद्रकांत खैरे यांच्या गाडीत फिरायला तयार’, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

| Updated on: Mar 06, 2024 | 5:45 PM

आगामी लोकसभा निवडणूकीआधी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या गाडीमध्ये बसण्यासाठी तयार असल्याचं भाजपच्या नेत्याने म्हटलं आहे. भाजपच्या या बड्या नेत्याने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. नेमकं असं का म्हणाले जाणून घ्या.

मी चंद्रकांत खैरे यांच्या गाडीत फिरायला तयार, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
Follow us on

संभाजीनगर | आगामी लोकसभा निवडणुकीआधी सत्ताधारी आणि विरोध एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. संभाजीनगरमध्येही अशीच परिस्थिती असलेली पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या गाडीत बसण्याचं आव्हान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी स्वीकारलं आहे. चंद्रकांत खैरे एकतरी विकास काम दाखवून देऊ शकत नसल्याची टीका कराड यांनी केली आहे.

अमित शहा यांची दीड लाखाची सभा पार पडली ही सभा यशस्वी झाल्यामुळे चंद्रकांत खैरे यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. संभाजीनगर शहराचा विकास इम्तियाज जलील यांच्यामुळे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामुळे खुंटला आहे. चंद्रकांत खैरे यांच्या गाडीत मी कधीही फिरायला तयार आहे. स्वतःला काम करता आलं नाही म्हणून मागच्या निवडणुकीत पराभव झाला, 20 वर्षांपासून शहराला पाण्याचा त्रास आहे, मी 140 किलोमीटर वरून गॅस लाईन आणली चंद्रकांत खैरे 60 किलोमीटर वरून पाणी आणू शकले नसल्याचं भागवत कराड यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.चंद्रकांत खैरे योग्य नेतृत्व नसल्यामुळे पराभव झालेला आहे. मी त्यांच्यासोबत डिबेट करायला तयार आहे. चंद्रकांत खैरे आमचे स्पर्धक नाहीत, आमची लढाई इम्तियाज जलील यांच्याशी, चंद्रकांत खैरे यांचा विषयच नाही. येणारी निवडणूक संभाजीनगर की औरंगाबाद अशी होईल, एमआयएम चं रोपटे उपटून टाकायची वेळ आली आहे. चंद्रकांत खैरे यांना कुणीही मतदान करणार नाही. एमआयएम ही भाजपची बी टीम असती तर आम्ही त्यांना गाडीत घेऊन फिरलो असतो पण आमची लढाई एमआयएम सोबत आहे. चंद्रकांत खैरे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असं म्हणत कराड यांनी खैरे यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. मुद्रा लोन मी किती दिलं हे मी पत्रकार परिषद घेऊन देणार आहे. आम्ही कुणाकडून पैसे घेत नाही, आम्ही काँत्रूब्युशन करून आम्ही सभा घेतो, चंद्रकांत खैरे यांना त्यांची जागा कळलेली असल्याचंही भागवत कराड म्हणाले.