छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या केतक जळगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटामधून विषबाधा झाल्याची घटना काल घडली.या जवळपास 257 मुलांना बाधा झाली होती,सुदैवाने यातील अडीचशे मुलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सात विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आज सकाळी छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.
संभाजी नगरातील पैठण तालुक्यातील केकत जळगाव परिसरात शनिवारी जिल्हा परिषदेच्या शाळेतील 80 मुलांची प्रकृती अचानक बिघडून उलट्या आणि मळमळ होऊ लागली. त्या पौष्टीक आहार म्हणून या विद्यार्थ्यांना बिस्कीटे देण्यात आली होती. त्यानंतरच त्यांना त्रास सुरु झाला.पाहाता पाहात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना हा त्रास होऊ लागला.
शालेय विद्यार्थ्यांनी पोट दुखी आणि उलट्या होऊ लागल्याने त्यांना सरपंच आणि इतरांना मिळून वाहनातून पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. फूड पॉझनिंगमुळे सुमारे 257 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली.केकत जळगाव जिल्हा परिषदेत शाळेत 296 मुले शिकत असून जवळपास सर्वच मुलांची तब्येत ढासळली. शनिवारी अर्धा दिवस शाळा असल्याने शाळा सकाळी आठ वाजता भरली. साडे आठ वाजता शिक्षकांनी मुलांना पोषक आहार म्हणून बिस्कीटे दिली.
ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बाबासाहेब घुगे यांनी 257 विद्यार्थ्याना या विषबाधेने त्रास झाला. परंतू अडीचशे विद्यार्थ्याना आता डिस्चार्ज दिला आहे. रविवारी सकाळी सात विद्यार्थ्यांची तब्येत अधिकच बिघडल्याने त्यांना सिव्हील रुग्णालयात हलविले असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बाबासाहेब घुगे यांनी सांगितले आहे. खासदार संदिपान भुमरे यांनी या प्रकरणात रविवारी सकाळी सिव्हील रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस केली. आणि मुलांच्या तब्येती संदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टरांनी या मुलांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितल्याने भुमरे यांनी पालकांची भेट घेत काळजी करु नका असे आवाहन घेतले आहे.