धारशीव : संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहे. स्वराज्य संघटना काढून संभाजीराजे हे महाराष्ट्र भर दौरा करत आहे. गाव तिथे शाखा आणि घर तिथे स्वराज्य ही संकल्पना घेऊन संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्रात संघटना वाढवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर धारशीव जिल्ह्यात संभाजीराजे यांचा दौरा सुरू असतांना माध्यमांशी बोलत असतांना सूचक विधान केले आहे. अनेक नागरिकांनी तुम्ही मुख्यमंत्री ( Chief Minister ) व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं ? असा सवाल विचारात संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या विधानावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
संभाजीराजे छत्रपती धाराशीव दौऱ्यावर असतांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल का ? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला होता त्यावर संभाजीराजे यांनी सूचक विधान केले आहे. त्यामुळे स्वराज्य संघटना पुढील काळात नेमका काय निर्णय घेणार याची चर्चा सुरू झाली आहे.
खरंतर आज धारशीव मध्ये शाखांचे उद्घाटन करत असतांना संभाजीराजे छत्रपती यांनी आरोग्य यंत्रेचा भंडाफोड केला आहे. आरोग्य मंत्ऱ्यांच्याच मतदार संघात जाऊन संभाजीराजे यांनी पोलखोल केली होती.
आरोग्य यंत्रणेचा कारभार कसा व्हेंटिलेटरवर आहे, याचा पंचनामा करत संभाजीराजे यांनी आरोग्य यंत्रणेचे वास्तव मांडले होते. त्यावरून संभाजीराजे यांचे नागरिकांनी कौतुक करत आभार मानले होते.
आरोग्य, शेती आणि शिक्षण या प्रमुख मुद्द्यांना घेऊन संभाजीराजे नागरिकांना भेटत आहे. नागरिकांनाचा वाढता प्रतिसाद पाहता संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी खेड्या पाड्यातील नागरिक करीत आहे.
तोच धागा पकडून पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि त्यावर संभाजी राजे यांनी महत्वाचे विधान केले आहे. संभाजीराजे म्हणाले मला राजकारणात पडायचे नाही पण सत्ता मिळाली तर कुणाला नको असते. मला खासदारकी मिळाली ती मी घेतली.
पण सत्ता हे एक टूल आहे. त्यातून महाराष्ट्रातील प्रश्न सुटणार असतील तर सत्तेत जायला कुणाला आवडणार नाही ? असे विधान संभाजीराजे यांनी करताच संभाजीराजे यांना मुख्यमंत्री व्हायचंय अशी चर्चा सुरू झाली आहे.
संभाजीराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची भूमिका घेतली होती. विद्यार्थ्यांचे प्रश्न लावून धरले होते. राज्यातील गड किल्ल्यांच्या संदर्भात मोठे काम केले आहे. काही ठिकाणी काम सुरू केले आहे. त्यामुळे त्यांची मोठी लोकप्रियता आहे.
अशातच स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून गावागावात जाऊन संभाजीराजे सर्वसामान्य नागरिकांना भेटत आहे. शिव-शाहुंचे वंशज असल्याने नागरिक मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत विधान केल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.