गोपीचंद पडळकरांचे बंधू आणि सांगलीतील ‘त्या’ पाडकामासंदर्भात मोठी अपडेट, वाचा नेमकं काय झालं?

| Updated on: Jan 08, 2023 | 4:17 PM

आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर आणि काल मिरजमध्ये झालेल्या पाडकामसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. वाचा...

गोपीचंद पडळकरांचे बंधू आणि सांगलीतील त्या पाडकामासंदर्भात मोठी अपडेट, वाचा नेमकं काय झालं?
Follow us on

सांगली :  आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर (Bramhanand Padalkar) आणि काल मिरजमध्ये झालेल्या पाडकामसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मिरजमध्ये पाडकाम (Miraj Shop Demolition) झालेल्या ठिकाणच्या 17 नागरिकांना कार्यकारी दंडाधिकारी यांची कलम 145 प्रमाणे नोटीस पाठवली आहे. पाडकाम झालेल्या ठिकाणी जैसे थे परिस्थिती ठेवण्याच्या नोटीसीद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. या जागेतील वादाबाबत उद्या मिरज तहसीलदार एक बैठक घेणार आहेत.

सांगलीच्या मिरज शहरामध्ये गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर आणि काल मिरजमध्ये झालेल्या पाडकामसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. कोणत्याही प्रकारचं काम करू नये, याबाबत नोटीस काढण्यात आली आहे.त्यामुळे याठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

सांगलीतील मिरजमध्ये काल मध्यरात्री पाडकाम करण्यात आलं. मध्यरात्री दोन वाजता एसटी स्टॅन्डजवळ हे पाडकाम करण्यात आलं. या पाडकामावर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. भाजपचे विधान परिषदेतेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरयांच्या विरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत. त्याचेच पडसाद आज पाहायला मिळाले.

जिथे कारवाई झाली तिथल्या नागरिकांनी या ठिकाणी नोटीसा घेण्यास नकार दिला आहे. या ठिकाणी असणारं साहित्य काढून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांकडून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं साहित्य घेऊन जाण्यास आणि पत्रे मारण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

पोलिसांकडून या ठिकाणी नुकसानग्रस्तांनी साहित्य भरण्यासाठी आणलेले ट्रॅक्टर देखील हटवले आहेत. त्यामुळे आता या ठिकाणचं साहित्य हलवून पत्र मारण्याचे काम थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे.