सांगली : खरंतर प्रत्येकाला वेगवेगळा छंद असतो. त्यात काहींना संग्रह करण्याची आवड असते. पण प्रत्येक आवडीत काही विशेष बाबी असतात. त्यामध्ये सांगलीतील एका दुकानदार आणि शेतकरी असलेल्या मावळ्याने अनोखा संग्रह केला आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील नागाव कवठे येथील संतोष पाटील यांचं इतिहास प्रेम यातून दिसून येत आहे. त्यांच्याकडे छत्रपतींच्या प्रतिमा असलेल्या एक हजार नाण्यांचे संकलन केले आहे. संतोष पाटील यांचं यातून शिवप्रेम दिसून येत आहे. संतोष पाटील हे शिवछत्रपतींच्या इतिहासाने भारावलेले मावळा आहे. 2022 मध्ये त्यांनी किराणा मालाचे दुकान सुरू केले त्यानंतर त्यांना हा छंद जडला आहे.
संतोष पाटील हे दुकानात काम करत असतांना त्यांच्याकडे व्यवहारात असलेले चलनी नाणी त्यांच्याकडे रोज शेकडो नाणी गोळा होत असत. मात्र त्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या नाण्याची त्यांना भुरळ पडली. आणि तिथूनच त्यांचा संकलित करण्यास सुरुवात झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली जमा होतील तेवढी नाणी त्यांनी संकलित करण्याचा निश्चय केला. 1997 ते 1999 या काळातील छत्रपतींची नाणी संतोष पाटील यांच्याकडे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संकलित होत गेली. पाहता-पाहता 1 हजारांवर संकलन केले आहे. नाण्यांचा संग्रह तयार झाल्यानंतर टे विविध नेत्यांना दाखवत आहे. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते नाणी दाखवत आहे.
छत्रपतींची प्रतिमा असलेल्या एक हजार नाण्याबरोबरच संतोष पाटील यांच्याकडे ज्ञानेश्वर माऊली यांची प्रतिमा असलेली दीडशे तर संत तुकाराम महाराजांची प्रतिमा असलेली दीडशे नाणी पाटील यांच्या संग्रहात आहेत.
खरंतर हजारो वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम कमी होत नसून ते वाढतच चालले आहे. महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या आठवणी जपण्याची आवडही अनेक शिवभक्तांमध्ये दिसून येत आहे.
संतोष पाटील यांच्याकडे व्यवहारासाठी नागरिक येत असल्याने त्यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी त्यानंतर हे संकलन केले आहे. खरंतर अनेक दुकानदार आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. मात्र, असे संकलन कदाचित संतोष पाटील यांच्याकडेच दिसून येत आहे.
खरंतर इतिहास जाणून घेण्याची आवड अनेकांना असते. मात्र, याच काळात महाराजांच्या संदर्भात असलेले संकलन करावं असं संतोष पाटील यांच्याच लक्षात आल्याने ते इतर दुकानदारांपेक्षा वेगळे ठरत असून त्यांचे कौतुक देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे.