पांडुरंगासोबत माझं डायरेक्ट कनेक्शन, आर. आर. आबांचं स्वप्न…; सांगलीच्या सभेत सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

| Updated on: Nov 17, 2024 | 1:11 PM

Supriya Sule on Vidhansabha Election 2024 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या सांगलीत आहे. वैभव पाटील यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. पांडुरंगासोबत माझं डायरेक्ट कनेक्शन असल्याचं सुळे म्हणाल्या. वाचा सविस्तर...

पांडुरंगासोबत माझं डायरेक्ट कनेक्शन, आर. आर. आबांचं स्वप्न...; सांगलीच्या सभेत सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule
Image Credit source: Facebook
Follow us on

सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघाचे, महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांची प्रचार सभा होत आहे. सुप्रिया सुळे यांनी सभेत बोलताना राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची आठवण काढली. मला आर आर पाटील यांच स्वप्न पूर्ण करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार हे वैभव दादा यांच्या सोबत आहेत. बाळासाहेब ठाकरे नंतर हे चिन्ह उद्धव ठाकरे यांचं आहे. दिल्लीची वाकडी नजर महाराष्ट्रवर नेहमी आहे. पोलीस संवाद आबांच्या मुळे पोलीस भरती पारदशर्क केली. आता देवभाऊने आबा नंतर एकही मोठी पोलीस भरती झाली नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

लोकसभेला लाडकी बहीण झाली आहे. पण या सरकारला नात्याची किंमत कळली नाही. नात्याला एवढी पंधराशे किमीत दिली. माझ्यावर टीका करतात. हो माझा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला. माझ्या हातात सहा बांगड्या माझ्या आईच्या आहेत आणि शरद पवार तुपाचे आहेत. माझा सोन्याचा चमचा हा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

माझा पांडुरंगावर विश्वास- सुप्रिया सुळे

माझा माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे. त्याच्याशी डायरेक्ट कनेक्शन आहे. मी त्यांनाच विचारून भाषण काय करू विचारते आणि भाषण करते. स्वच्छतेविषयी बोलताना मी त्या देवा भाऊंसारखं कॉपी करणार नाही.काम करायचे असेल तर मन मोठं लागतं. महागाई आणि बेरोजगारला आम्ही कंटाळलो आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

“50 खोके नॉट ओके”

तुम्हाला असा गृहमंत्री पाहिजे जो बंदूक घेऊन उभा राहतो. माझी लढाई कोणाशी वैयक्तिक नाही माझी लढाई वैचारिक अशी आहे. तुम्ही जर बेरोजगारी महागाई वाढवली तर त्याच्याशी माझी लढाई आहे. लाडकी बहीण आहेच पण ती महालक्ष्मी आहे आणि 3 हजार तिला देऊ. सत्ता सत्ता काय असते. तुम्हाला हमीभाव देण्यासाठी सत्ता मागते. तुम्हाला साधन देण्यासाठी सत्ता मागते. विरोधक येतील आणि देतील, दोन्ही हाताने घ्या. मी चहा देईन. ते जे देतात ते त्याचे नाही तुमचेच आहेत. पण तुमच्या मनात जे आहे ते करा. कारण 50 खोके नॉट ओके…. हे गलिच्छ राजकारण दुर्देवी आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.