कमळाचं बटण दाबा, नाहीतर राहुल गांधींना…; देवेंद्र फडणवीसांचं सांगलीतील विधान चर्चेत

| Updated on: Apr 18, 2024 | 7:30 PM

Devendra Fadnavis on Loksabha Election 2024 : सांगलीत बोलताना देवेंद्र फडणवीस बोलले, चर्चा मात्र महाराष्ट्रभर... सांगलीतील प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख, सांगलीकरांना संबोधित करताना फडणवीस नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

कमळाचं बटण दाबा, नाहीतर राहुल गांधींना...; देवेंद्र फडणवीसांचं सांगलीतील विधान चर्चेत
Follow us on

लोकसभा निवडणुकीत आता प्रचाराचा रंग चढू लागला आहे. ठिकठिकाणी प्रचारसभा होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघ असणाऱ्या सांगलीत आज महायुतीची महासभा होत आहे. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. यावेळी कमळाचं बटण दाबा असं आवाहन केलं. याचवेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला. संजय काका पाटील यांच्या पाठीशी उभं राहा. संजय काकांसाठी कमळाचं बटण दाबलं की मत नरेंद्र मोदी यांना मिळेल. अन्य कुणाचं बटण दाबलं तर मत राहुल गांधीना मिळेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सध्या होत असलेली निवडणूक ही दिल्लीची निवडणूक आहे.. गल्लीची निवडणूक नाही… सांगलीपर्यंत विकासाची गंगा आणण्याची ताकद मोदीजींमध्ये आणि संजय काका यांच्यामध्ये आहे. अख्खी सांगली संजय काकांच्या पाठीशी आहे. भाषणांनी विकास होत नाही. त्यामुळे संजय काकांच्या पाठीशी उभं राहा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीकरांना केलं आहे.

इंडिया आघाडीवर निशाणा

आमच्याकडे पण पैलवान आहेत. आपली विकासाची गाडी मोदीजींची आहे. आपली विकासाची गाडी आली आहे. तिकडे डब्येचं नाहीत आहेत. लालूप्रसाद यादव म्हणतात, मी इंजिन आहे. ममता बँनर्जी सांगतात मी इंजिन आहे. शरद पवार सांगतात मी इंजिन आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

महायुतीला मतदान करा; फडणवीसांचं आवाहन

संजय काकांना आपल्याला तिस-यांदा आपल्याला निवडून आणायचं आहे. सांगलीकरांना विकासाकडे ते घेवून चालले आहेत. गेल्या दहा वर्षामध्ये भारताचा चेहरामोहरा नरेंद्र मोदी साहेबांनी बदलला आहे. देशातील 20 कोटी लोकांना घर मिळालं. मोदीजींच्या नेत्वृवात गावागावात पाणी पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. वर्ल्ड बँकनं तत्वता मान्यता सुद्धा दिलीय. पुराचं पाणी वाहून जातं ते आमच्या कामी येईल, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

मोदींच्या कामाचं कौतुक

मोदीच्या नेत्वृवात एवढे महामार्ग झाले. अर्थव्यवस्था मोठी होती. तेव्हा संधी निर्माण होते. आज एक सुरक्षित भारत झालेला आहे. मोदीजीच्या नेत्वृवात एक भारत तयार झालाय. त्यामुळे सांगलीकरांना विनंती आहे की त्यांनी संजय काका पाटील यांनी आपला प्रतिनिधी म्हणून निवडावं, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.