सांगली : काल दुपारी कृष्णा नदीच्या (Krushna river) पात्रात मेलेल्या माशांचा (Fish Death) खच आढळल्याने सांगली शहरात (Sangli)मोठी खळबळ माजली आहे. ते पाणी पिण्यासाठी तरी योग्य आहे का ? असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. काल दुपारी उन्हाच्या तडाख्यात मासे मृत्यूमुखी पडल्याचे पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. नागरिकांचं आरोग्य नदीच्या पाण्यामुळे धोक्यात असल्याचं अनेकांनी बोलून दाखवलं आहे. काल दुपारी काही मासे तडफडून मरत होते. त्यावेळी घटनास्थळी बघ्यांची अधिक गर्दी झाली होती. त्यावेळी काही नागरिक पाण्यात उतरले आणि तडफडणारे मासे ताब्यात घेतले. या प्रकरणी प्रशासन कुणावर कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
मासे मृत्यू प्रकरणी सांगली प्रदूषण महामंडळाने उगारला कारवाईचा बडगा उगल्याची माहिती मिळाली आहे. अंकली येथील कृष्णा नदीतील मासे मृत्यू प्रकरणी सांगलीच्या दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याला प्रदूषण मंडळाने नोटील दिल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. दत्त इंडिया संचलित साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी नदीत मिसळल्याने माशांच्या मृत्यूचा प्रकार उघडकीस आला आहे. साखर कारखाना बंद का ? करू नये याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. सांगली महापालिकेलाही फौजदारी कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. प्रदूषण महामंडळ अधिकारी नवनाथ औताडे यांनी ही माहिती दिली आहे.
तसेच सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदीतील मासे मृत्यूनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.संतप्त स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगली महापालिका आयुक्तांच्या घरासमोर मृत मासे फेकले आहेत.आयुक्त सुनील पवार यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारासमोर हे मृत मासे टाकल्याची माहिती मिळाली आहे.
सांगली जिल्ह्यातून जात असलेल्या कृष्णा नदीच्या काठी अनेक कारखाने आहेत. त्या कारखान्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्यात प्रदुषण होत असल्याच्या तक्रारी आतापर्यंत अनेकांनी दिल्या आहेत. परंतु कसल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे नागरिक सांगत आहेत.